तालुक्यात पल्स पोलियो मोहिम

0
Bnn

- नांदगाव तालुक्यात रविवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी८ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत पल्स पोलीओ या राष्ट्रीय कार्यक्रमा अंतर्गत ९४.१९ ℅ टक्के काम झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाने यांनी दिली. न्यायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनीताई आहेर यांनी लाभार्थी बालकांना पोलीओ च्या औषधांचा डोस पाजून उदघाटन केले. तर ठिकठिकाणी शहरात तसेच गावात मान्यवरांनी उदघाटन करुन पोलीओ मोहीमेच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात केली.
 यासाठी तालुक्यात मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयासह न्यायडोंगरी, हिसवळ, वेहेळगाव, पिंपरखेड आणि बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच उपकेंद्रात, तसेच शहरात आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी २३१ ठिकाणी बुथ लावण्यात आल्या होत्या. तर पल्स पोलीओ मोहीम यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागाचे ६१८ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम  घेऊन झिरो ते पाच वर्ष वयोगटातील ३३,२२२ आपेक्षित लाभार्थ्यांपैकी ३१,४५० लाभार्थ्यांना पोलीओ डोसचे प्रत्येकी दोन थेंब औषधांचे पाजले. 

त्यासाठी २२५० व्हायल्स बुथवर नेण्यात आल्या होत्या पैकी १७६४ व्हायल्सचा वापर करण्यात आला असून ४८६ पुर्ण व्हायल्स (औषधांच्या बाटल्या) परत आल्या अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ससाने यांनी दिली .


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top