नांदगाव तालुक्यातील घटना पिंप्री हवेली येथे बिबट्या सदृश प्राण्याने दोन पशुधनाचा मृत्यू

0


B.N.N
अरुण हिंगमिरे
पिंप्री हवेली
नांदगाव, नाशिक

नांदगाव तालुक्यातील पिंप्री हवेली येथील शेतकरी गोविंद भिमराव पाटील यांच्या शेतात त्यांच्या मालकीच्या एका  पाच महिण्याच्या पारडी वर दोन दिवसापुर्वी आणि सोमवार दि.२० रोजी गोठ्यात बांधलेल्या दिड वर्षाच्या म्हशीवर  रात्रीच्या सुमारास बिबट्या किंवा तरसाने हल्ला चढवत जिवे ठार मारले आहे. 


वरील घटनेची  येथील पोलीस पाटील सचिन रावसाहेब पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही पशुधनाचे शवविच्छेदन जातेगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी ए.आर. देवकर आणि परीचर ए.बी. शेलार यांनी केले. तसेच नांदगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी वडगे, वनरक्षक पठाण, वनरक्षक राजेंद्र दौंड, वन कर्मचारी यांनी वरील घटनेचा पंचनामा करुन पुढील कार्यवाहीसाठी कार्यालयात सादर केला आहे. 

सदर घटनेमुळे पिंप्री हवेली आणि परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून वन विभागाच्या वतीने वनपरिमंडल अधिकारी वडगे यांनी नागरिकांना दक्ष रहा, सतर्कता बाळगा, रात्री अपरात्री शेतात काम करत असतांना उजेडासाठी मोठी  बॅटरी सोबत असू द्या त्याचप्रमाणे पाळीव प्राणी बंदिस्त ठेवा लहान मुलांना एकटे कोठे पाठवू नका याबाबत मार्गदर्शन केले.


 मागील एक वर्षापूर्वी पडधाडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी मनोज पाटील यांची जिल्ह्यातील देवळा येथे बदली झाल्यापासून तेथील कार्यभार नांदगाव येथील पशुसंवर्धन विभागाकडे असल्याने पडधाडी पिंप्री हवेली आणि हिंगणे या गावातील पशुधन मालकांना आपले पशुधन आजारी पडल्यावर उपचार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असल्याने पडधाडी येथे पशुवैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top