नांदगाव नगरपरिषदेच्या विषय समिती व सभापती पदाची निवड

0




B.N.N
अरुण हिंगमिरे
नांदगाव, नाशिक

 नांदगाव नगर परिषदेच्या विषय समिती आणि त्यांच्या सभापतीपदाची करण्यासाठी तहसीलदार मनोज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दि.२१ जानेवारी रोजी सकाळी११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
 पहिल्या सत्रात विषय समित्यांची संख्या ठरविणे, विषय समित्यांवर व स्थायी सदस्यांचे नामनिर्देशन करणे. 

उपाध्यक्ष ज्या विषय समितीचा पदसिद्ध सभापती असेल ती समिती ठरविणे. त्यानुसार विषय समित्यांची संख्या चार व उपाध्यक्ष हे सार्वजनिक बांधकाम समितीचे पदसिद्ध सभापती असतील हे सर्वानुमते ठरविण्यात आले. सार्वजनिक बांधकाम, स्वछता व आरोग्य समिती, पाणी पुरवठा व मल निसारण समिती, महिला आणि बालकल्याण समिती यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र आल्याने व ते वैध असल्याने विषय समित्यांची निवड अविरोध झाली.


 दुसऱ्या सत्रात स्थायी समिती सदस्यांचे नामनिर्देशन, स्थायी समिती रचना, स्थायी समिती सदस्य संख्या ही सहा असेल. स्थायी समिती सभापती नगरपरिषदेचे अध्यक्ष पदसिद्ध असून विषय समितीचे सभापती हे स्थायी समितीचे सदस्य असतील असे प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार नांदगाव यांनी घोषित केले. 


स्थायी समिती सदस्य संख्या सहा असल्याने चार विषय समितीचे सभापती हे स्थायी समितीचे सदस्य असतील सहाव्या सदस्यासाठी याकूब अब्दुल शेख यांचे नाव सर्वानुमते सुचविण्यात आले.

 यावेळी सभागृहात चौदा नगरसेवक उपस्थित होते. याप्रसंगी विषय समिती सभापती पदाची निवड करणे व स्थायी समिती सभापती निवड करणे बाबतच्या बोलविण्यात आलेल्या  बैठकीचे कामकाज दुपारी एक वाजता सुरू होऊन चार वाजता पूर्ण झाले. सभेचे कामकाज चालविण्यासाठी नगराध्यक्ष तसेच नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रिया देवचक्के यांचे तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


स्थायी समितीची रचना पुढील प्रमाणे 

१. राजेश रामराव कवडे नगराध्यक्ष  ( सभापती ) पदसिद्ध 

२. नितीन दयाराम जाधव सार्वजनिक बांधकाम समिती सभापती (सदस्य)

३. मनीषा यशवंत काकळीज स्वच्छता व आरोग्य समिती सभापती (सदस्य)

४. कामिनी सचिन साळवे (पाणी पुरवठा व                         मलनिस्सारण)

५)  संगिता शंकर जगताप महिला आणि (बालकल्याण            सभापती)

६) याकूब अब्दुल शेख (स्थायी समिती सदस्य)

अरुण हिंगमिरे
बिंदास मिडीया
नांदगाव, नाशिक

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top