B.N.N
अरुण हिंगमिरे
जातेगाव, नांदगाव
नाशिक
नांदगाव तालुक्यातील कासारी- जातेगाव -लोढरा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ९१ हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून मोटमोठे खड्डे पडल्याने दुचाकी चारचाकी आणि इतर वाहने चालवीतांना वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ह्या खराब झालेल्या ११ किलोमीटर रस्त्यासाठी सन २०१८/१९ मध्ये दोन कोटी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे परंतू मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यासाठी निधीसाठी उपलब्ध नसल्यामुळे ठेकेदाराने काम सुरू केले नाही.
त्याचप्रमाणे वरील रस्त्याला लागुनच असलेल्या वाकला- जातेगाव- बोलठाण- रोहीले ह्या प्रमुख जिल्हा मार्गाच्या ६.१६ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी तसेच जातेगाव पासून बोलठाण रस्त्यावर एक. १ किलोमीटर अंतरावर असलेल्या खरोळी नावाच्या नदीवरील नवीन पुलासाठी रस्त्यासाठी दोन कोटी १७ लाख रुपये सन २०१९/ २०२० च्या अर्थ संकल्पात मंजूर करण्यात आले आहे. परंतू ह्या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी (वर्क ऑर्डर) म्हनजेच कार्यारंभ आदेश नसल्यामुळे ह्या रस्त्याचे काम देखील ठेकेदाराने सुरु केले नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल चोळके यांनी सांगितले. वरील दोन्ही रस्त्याचे आणि काम घेतलेल्या शिवशक्ती कंट्रक्षन कंपनी काम सुरू करण्यासाठी यांना वारंवार पत्र व्यवहार करण्यात आलेला असून त्यांच्याकडून कुठले प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचे अभियंता चोळके यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मात्र एखाद्या वाहनाचा अपघात होवून जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरील दोन्ही रस्त्यांप्रमानेच तालुक्यातील इतर ही प्रमुख जिल्हा मार्गांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असून
तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार मधिल सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात जवळपास जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांचे कामे झाले होते, परंतू भाजप शिवसेना सरकारच्या पाच वर्षात प्रमुख रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळणी झाल्याचे चित्र दिसून येत असून आता महाआघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ आणि दादाजी भुसे या वजनदार नेत्यांची मंत्री मंडळात वर्नी लागल्याने नांदगाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील रस्त्यांना पुनर्वैभव प्राप्त होईल का हे पाच वर्ष तालुक्यातील नागरिकांना रस्त्यावरून नव्हे तर खड्यातुन प्रवास करावा लागेल या बाबत नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.