B.N.N
अरुण हिंगमिरे- मालेगाव, नाशिक
आज मालेगाव कळवण रस्त्यावरील मेशी फाटा नजीक हॉटेल देश-विदेश जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीत प्रवाशांनी भरलेली बस ( एम एच ०६ ८४२८ ) ह्या बसचे पुढचे टायर फुटल्याने समोरून येनार्या एम एच १५. डी. सी.४२३३ ह्या रिक्षाला धडक देऊन रिक्षासह रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीचे कठाडे तोडून विहिरीत पडल्याची दुर्दैवी घटनेत मृतांची संख्या २५ झाली असून ३५ जन जखमी आहे. वरील अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोक व्यक्त करुन सर्व शासकीय यंत्रणेला योग्य ती मदत करण्याबाबत सुचना दिल्या, तर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या घडलेल्या वरील अपघात घडला होता, दरम्यान वरील दुर्दैवी घटना समजताच आमदार राहुल आहेर हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्यात सहभागी झाले. दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मदतकार्य सुरु करुन बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले होते. या बसच्या खाली एक रिक्षा देखील अडकली होती. या अपघातात सुरुवातीला ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. तसेच ३० ते ४० प्रवासी जखमी झाले असतील असाअ अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
मात्र आज मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा मधील प्रवासी आजीज नथू मन्सुरी वय६१ , हजराबाई अजीज मन्सूरी वय ५५, जावेद अंंन्सार मन्सूरी वय ११, ज्ञानेश्वर शांतीलाल सूर्यवंशी वय २५ हे चार जन राहणार येसगाव आणि अन्सारभाई मन्सुरी वय ४१, शाहिन अन्सारभाई मन्सूरी वय ३२, दोघे राहणार सटाणा तसेच शाहिस्ता शकिन मन्सूरी वय ३५ रा.मुंबई, व कुरबान दादाभाई मन्सूरी वय ६१, फारुख भिकन मन्सूरी वय ५५ राहणार करंजगव्हान या नऊ जनांचा मृत्यू झाला
आणि बस मधिल बस चालक प्रकाश बच्छाव आणि कल्पना योगेश वनसे रा. निंबायती निमगाव, शिवाजी रुपला गावित रा.कळवण, चंद्रभागाबाई उगले रा. सरस्वतीवाडी, अंकुश संपत निकम रा.वाखारवाडी, अलका दिगंबर मोरे रा. खर्डे, शितल अमोल आहिरे रा.नामपूर, रघुनाथ मेतकर रा.देवळा, शांताराम चिंधा निकम रा.डोंगरगाव ह्या मयत झालेल्या प्रवाशांची ओळख पटली असून इतर सहा प्रवाशांची ओळख पटली नाही.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले होते. यासह आमदार राहुल आहेर, पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका देखील बचावासाठी दाखल झाले होते. दोन क्रेन मशीन्सच्या सहाय्याने बस विहिरीतून काढण्यात आली असून जखमींना मालेगाव व देवळा येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर काही जखमींवर देवळ्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वरील अपघाताची माहिती समजताच नाशिकहून जिल्हा रूग्णालयाच्या पाच गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या.