बोलठाण येथील व्यापाऱ्यांच्या भुईकाट्यात ५० किलो मागे २० किलोचा फरक भुईकाटा बाजार समितीचे सचिव खैरनार यांनी केला सील

0


B.N.N
अरुण हिंगमिरे
बोलठाण, नांदगाव
नाशिक

बोलठाण येथील अरिहंत वे ब्रिज या अरिहंत ट्रेनिंग कंपनीच्या भुईकाट्यात पंन्नास किलो वजनामागे २० किलोचा फरक अढळून आल्याने सील करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, नांदगाव बाजार समिती अंतर्गत असलेल्या बोलठाण येथील उप बाजार समिती येथील आवारातून लिलाव बोली बोलुन मे.अरिहंत ट्रेनिंग कंपनी या आडत्याने जातेगाव येथील संतोष सुखदेव पवार या शेतकर्याचे दोन प्लास्टिक कॅरेटमध्ये आणलेले कांदे विकत घेतले, ते विकत घेतलेले कांद्याच्या  कॅरेटचे वाजन त्याच  व्यापाऱ्याच्या भुईकाट्यावर केले असता आगोदर दोन कॅरेट भरलेल्या कांद्याचे तीस किलो वजन भरले त्या शेतकऱ्यांना शंका आल्यानंतर त्यांनी पुन्हा दोन्ही कॅरेटचे वजन केले असता 50 किलो भरले.

वरील प्रकाराबाबत शेतकरी संतोष पवार यांंनी त्या व्यापार्याच्या विरोधात येथील उप बाजार समितीच्या लिपीकाकडे आपली तक्रार केली. त्यानंतर वरील व्यापार्यास संजय नामदेव पवार, शांताराम रतन पवार, संतोष सुर्यवंशी यांच्यासह ज्या शेतकर्यांनी आपला कांदा, मका इत्यादी विकला होता ते सर्व शेतकरी एकत्र येवून त्यांनी ठिय्या मांडला घडलेल्या प्रकाराची दखल घेऊन बाजार समितीच्या लिपीकाने नांदगाव येथील मुख्यालयात सचिव अमोल खैरनार यांना अवगत केले असता त्यांनी बोलठाण येथे येवून प्रत्यक्ष पहाणी केली त्यात शेतकर्यांनी केलेली तक्रार योग्य वाटल्याने त्यांनी वरील अरिहंत ट्रेडिंग कंपनी या व्यापार्याचा भुईकाटा सीलबंद केला, आणि पुढील कार्यवाहीसाठी वजनमापे निरीक्षक यांना भुईकाटा तपासणी करण्यासाठी त्व
रित पत्र पाठवले आहे. यावेळी उपस्थित प्रहार शेतकरी संघटनेचे 

तालुकाध्यक्ष संदीप सुर्यवंशी यांनी सांगितले की या पुर्वी अशीच घटना बोलठाण येथे घडली असता कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यावेळी त्वरीत दखल घेतली नाही वेळकाढू पना केला तसेच संम्नधित व्यापाऱ्यांस पाठिशी घातले त्यामुळे पुन्हा हा प्रकार घडला परंतू आता तसे चालणार नाही बाजार समितीने वेळीच दखल घेऊन कार्यवाही केली नाही तर प्रहार शेतकरी संघटना आपल्या स्टाईल ने व्यापार्यास धडा शिकवेल,आणि त्याच्या होणाऱ्या परिणामास बाजार समिती आणि व्यापारी जबाबदार असेल असे म्हटले.त्या नंतर सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सतरा शेतकर्यांच्या सह्या केलेले बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार निवेदन देण्यात आले असून त्यात वरील अरिहंत ट्रेनिंग कंपनीच्या संचालकाच्या विरोध गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्यांची अनज्ञाप्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.  वरील प्रकार घडल्याचे परिसरात समजल्यावर मोठ्या संख्येने शेतकरी देशाचा नागरिक अर्यन ट्रेडिंग कंपनीच्या भुईकाट्याच्या ठिकाणी जमा झाल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस नाईक गांगुर्डे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बोलविण्यात आले होते


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top