BN.N
अरुण हिंगमिरे
जातेगाव, नांदगाव
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे माजी आमदार पंकज भुजबळ यांनी नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणेसाठी दहा लाख रुपयांचा निधी आमदार निधीतून दिला होता. ई निवीदा भरुन हे काम सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील महालक्ष्मी मजूर सहकारी सोसायटी यांनी घेतले होते परंतु सदरचे काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वरील संस्थेला का यादीत टाकले असल्याचे समजते.
सविस्तर वृत्त असे की, सन १९७८/७९ मध्ये तत्कालीन आ.कन्हैय्यालाल नहार यांनी तालुक्यात अनेक गावांना नळपाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी प्राधान्य दिले होते.
त्यापैकी एक योजना जातेगाव येथे राबविली होती. त्यावेळी दिडलाख लिटर पाण्याची क्षमता असलेला जलकुंभ, एक विंधन घर, विहिरीपासून पाईपलाईन आणि अंतर्गत पाईपलाईन, चौकाचौकात नागरिकांसाठी सार्वजनिक नळ अशी योजना होती.
कालांतराने वाढलेल्या लोकसंख्येमुळे एका जलकुंभावरुन पुर्ण गावास पाणी पुरवठा करणे आवश्यक झाल्याने स्थानिक ग्रामपालीका प्रशासनाने माजी आ. पंकज भुजबळ एका पाण्याच्या टाकीची मागणी केली होती, त्या अनुषंगाने भुजबळांनी सन २०१८/१९ च्या आमदार निधीतून एक लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणेसाठी दहा लाख रुपये निधी दिला होता.
या कामाचे ई टेंडर महालक्ष्मी मजूर सहकारी संस्था बारगाव पिंप्री (सिन्नर) या संस्थेने घेतले होते. परंतू प्रत्यक्षात त्यांनी स्वतः पाण्याच्या टाकीचे काम न करता दुसर्याच पोट ठेकेदारास काम दिले, परंतू संम्नधित पोट ठेकेदाराने काम अर्धवट सोडून दिल्याने या कामाचे मुख्य ठेकेदार असलेल्या महालक्ष्मी संस्थेला येवला येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तात्काळ व वेळेत वरील जलकुंभाचे काम पुर्ण करणेबाबत पत्र पाठवले परंतू त्यांनी काम पुर्ण केले नसल्याने संम्नधित संस्थेला काळ्या यादीत समावेश करण्यात आला असून त्यांनी आतापर्यंत त्यांनी केलेल्या टाकीच्या कामासाठी रक्कम अदा केली नाही तसेच उर्वरित कामाची पुन्हा निवीदा काढण्यात येणार आहे. त्यानंतर काम सुरु करण्यात येईल असे अभियंता कांतीलाल झेंडे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले.