तालुका कृषी विभागामार्फत जवळकी येथे शेती शाळेचे आयोजन

0


B.N.N
अरुण हिंगमिरे
बोलठाण, नांदगाव

मौजे जवळकी ता.नांदगाव येथे  बंडू पवार यांच्या शेतात 
शेतीशाळा घेण्यात आली, याप्रसंगी खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या योग्य  नियोजन कसे करावे याबाबत तालुुका कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले


 यावेळी शेतीशाळेस जे. आर. पाटील तालुका कृषी अधिकारी नांदगाव यांनी ऊपस्थित  शेतकऱ्यांना कापूस पिकावरिल बोंडअळी  तसेच मका व ज्वारी  पिकावरील लष्करी अळी यांचे सेंद्रीय पध्दतीने नियंत्रण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच एस. आर. डोखे मंडळ कृषि अधिकारी न्यायडोंगरी यांनी  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना तसेच  सुक्ष्मसिंचन योजनाबाबत मार्गदर्शन केले. 


 तसेच कृषी सहाय्यक अमोल थोरात व अविनाश पुराणे यांनी फवारणी करतांना घ्यावयाची काळजीचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. सदर शेतीशाळेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना राजेश नाईक कृषि सहाय्यक यांनी हरभरा पिकासाठी फेरोमन ट्रॕप तसेच ईमामेक्टीन बेन्झोएट या  किटकनाशकाचे  वाटप केले.शेतकऱ्यांमध्ये सांघिक भावना वाढावी म्हणून बादलीत चेंडू टाकणे हा सांघिक खेळ घेण्यात आला. 


या खेळात सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून भाग घेतला. सदर शेतीशाळा  संपल्यानंतर शेतकरी बांधवांसाठी खास वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.सदर शेतीशाळेस   जवळकी येथील  सरपंच मुक्तार पटेल भिमराज  गुंजाळ पंढरीनाथ चव्हाण गजानन चव्हाण संतोष बारवकर बंडू पवार अप्पू भाई तसेच जवळकी शिवारातील शेतकरी उपस्थित होते. सदर शेतीशाळेच्या यशस्वीतेसाठी  कृषि सहाय्यक राजेश नाईक  अमोल थोरात व  अविनाश पूराणे यांनी परिश्रम घेतले. तसेच गणेश शिंदे यांनी ऊपस्थितांचे आभार मानले. व शेतीशाळेचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top