चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण नांदगांव आगाराची बस घाटातील आवघड टप्प्यावर बंद

0
Bindass News Network 
अरूण हिंगमीरे



नांदगांव बस आगार नेहमीच रस्त्यावर बंद पडणार्‍या बसेसमुळे चर्चेत असतो. नांदगांव आगाराची बस प्रवास्यांना त्यांच्या ईच्छीत स्थानापर्यंत पोहोचले , याबद्दल आता शंका येत आहे .शनिवार दि. ४ जानेवारी रोजी नांदगाव आगाराची नांदगांव हुण कन्नड कडे दुपारी 12.४५ वाजता बस स्थानकातून  निघाली एम. एच.१२ ई.एफ ६८७० सोळा हि बस १६ कि. मी अंतरावर कासारी जवळील चांदेश्ववरी हा अवघड घाट आहे. या घाटात अवघड वळणावर १.४५ मिनिटांनी चढ्याच्या ठिकाणी गाडी घाट चढत असतांंना गाडीच्या ईंजीनला इंधन(डिझेल) कमी प्रमाणात मिळाल्याने बंद पडली.यावेळी चालक आणि वाहक यांनी  प्रसंगावधान राखून तातडीने गाडी उभी करून लगेच दगडाच्या ओटी लावल्याने पुढील आनंद अनर्थ टाळला.


 व्हि.व्ही. घुगे यांनी अनेक प्रयत्न करून पाहिले परंतु इंजिन चालू होत नाही. हे त्यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बस डेपो मध्ये भ्रमणध्वनी हुण संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पर्यायी दुसरी बस दोन वाजून तीस मिनीटांनी सदरची बस बंद पडलेल्या ठिकाणी आली. तोपर्यंत अबालवृध्दांसह महिला,विद्यार्थी आणी ईतर सुमारे ३५ ते ४० प्रवास्यांना दोन तासापेेक्षा अधिक वेळ तीन वाजेपर्यंत घाटातच ताटकळत बसावे लागले. या वेळी  चालक घुगे यांनी प्रसंगावधान राखून गाडी एका बाजूला घेतली व वाहक एसपी गिरी मोठ्या दोन दगडाच्या ओटी लावली नसती तर कदाचित ही गाडी मागील   सुमारे ७० फुट खोल दरीत जाउन अनर्थ घडला असता. 


याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी साखर कारखान्याचे मजुर घेऊन जात असताना
ब्रेक न लागल्याने एक ट्रक गेल्याने  अनेक जरा जनावरे तसेच तसेच दोन मजुरांचा  मृत्यू झाला होता आणि अनेक जण  मजूर जखमी झाले होते   तांत्रिक अडचणींमुळे  बसबंद पडने हे नेहमीचेच झाल्याने नांदगांव आगाराची बस वेळेत  प्रवास्यांना ईच्छितस्थळी पोहोचवेल याबाबत काही न बोललेलेच बरे, याव्यतिरिक्त ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेस मोठ्या प्रमाणात खिळखीळा झालेल्या असुण खिडक्यांसह ईतर बॉडी पार्टच्या येणाऱ्या आवाजामुळे शेजारच्या प्रवास्या सोबत मोठमोठ्याने बोलावले लागते, तसेच अस्वच्छता असल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. 
अनेक वेळा विवीध रस्त्यावर नांदगांव बस आगाराच्या गाड्या डिझेलमुळे किंवा तांत्रिक आडचणीमुळे बंद पडल्याने प्रवास्यांना अनेक अडचणी आल्याच्या बर्याच वर्तमान पत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या, परंतु अध्याप वरील परीस्थीतीत बदल होतांना नाही.अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठिशी घालतात की काय अशी शंका येने स्वाभाविक झाले आहे. वावंवार बस रस्त्यावर बंद पडत असल्याने अपंग, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी हा प्रवासी वर्ग वगळता इतर बहुतेक प्रवासी खाजगी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधुण प्रवास करण्यास पसंत करत आहे,त्यामुळे त्यांना आपोआप सुगीचे दिवस आले आहे.नांदगांव आगाराच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या उत्पन्नात घट झाली असल्याचे परीवाहण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले आहे. वरील परीस्थीती बदलण्यासाठी अधिकारी वर्गाने प्रयत्न केले तर पुण्हा प्रवासी एसटीने प्रवास करण्यास पसंत करतील याकडे लक्ष द्यावे असे मत युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष अयुब शेख,युवासेना तालुका प्रमुख गुलाब पाटील, शिवसेना अध्यक्ष मारुती सोनवणे भरत पाटील, यांनी व्यक्त केले. 
________________________________________________________
* प्रमुख मुद्दे *

* तांत्रिक चाचणीमुळे वारंवार रस्त्यावर बसबंद पडत असल्याने प्रवास्यांमध्ये नाराजी *
* जुनाट व खिळखीळा झालेल्या बसेस मुळे रस्त्याणे चालतांना खिडक्यांसह बॉडीपार्टचा मोठा आवाज त्यामुळे शेजारच्या प्रवास्या सोबत बोललेले सुध्दा समजणे कठीण झाले आहे * 
* ग्रामीण भागात धावणाऱ्या बस मध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी *
* वरील कारणांमुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना सुगीचे दिवस *
*अनेक वेळा वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होऊण ही सुधारणा होत नाही *

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top