सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्या

0
B-N-N
शिवदास सोनोने


दोन वर्षापासून शेतकरी हा दुष्काळ व नापिकीमुळे मोडकळीस आला असून ह्यावर्षी अतिवृष्टीने त्याचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल  हेक्टरी पंचवीस  हजार रुपये आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना करून संपूर्ण कर्जमाफीसह सातबारा कोरा करा तसेच सण २०१९--२० चे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याचे खात्यात विनाविलंब जमा करा ह्या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

तालुका भाजपा अध्यक्ष राजेंद्र गांधी यांचेसह नगराध्यक्ष सौ सीमाताई  कैलास डोबे,उपाध्यक्ष  सौ रत्नप्रभा अरुण खिरोडकर नवनियुक्त सभापती सौ रंजना संतोष ठाकरे, उपसभापती महादेव धुरडे, जिप बांधकाम सभापती राजेंद्र उमाळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष  सचिन देशमुख , प्रकाश पाटील , गिताबाई बंडल , एकनाथ वनारे, अशोक काळपांडे, वाल्मीक राव ठाकरे ,नगरसेवक निलेश शर्मा ,


 डॉ.राजेंद्र तानकर, विजय तिवारी , गजानन सरोदे, कैलास डोबे,रामा इंगळें, गुणवंत कपले, एम आर वानखडे ,रवींद्र कुटे, परिक्षित ठाकरे मिलिंद मुळतकर ,मंगेश वेलकर, विजय सोनवणे ,अरुण खिरोडकर, गणेश फाळके, सुनील रघुवंशी ,श्रीकांत अव्हेकर ,देवानंद राखुंडे यांचेसह भारतीय जनता पक्षाच्या बहुसंख्य पदाधिका-यांची निवेदन देतेवेळी उपस्थिती होती.उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर-गावंडे यांनी निवेदनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.  



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top