B.N.N
अरुण हिंगमिरे
नांदगाव, नाशिक
नांदगाव तालुक्यातुन औरंगाबाद जळगाव या जिल्हाच्या गावांना त्याचप्रमाणे मालेगाव आणि येवला या तालुक्यांना प्रमुख जानार्या प्रमुख महामार्गांचे कामे हे हायब्रीड अनेवटी मॉडेल एन. आर सी ५६ या योजनेतील कामे अतीषय संतगतीने सुरू असल्याने मोठ्याप्रमाणात धुळीचे सांम्राज झाले असुन प्रदूषणात वाढ झाली आहे. या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे कामे हे जुना रस्ता संपूर्ण खोदून त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण करणे तयार करण्यात येणारा रस्ता हा साधारण दोन फूट उंचीचे कॉंक्रेट ओतून चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात अनेक वर्ष या रस्त्यांना दुरुस्ती अथवा नवीन करण्याचे काम पडणार नाही.
परंतु वरील काम धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांना तसेच प्रवाशांना उडनार्या धुळीमुळे प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी गाडीचा स्पिड किती असावा, यासह इतर सुचना फलक लावणे जरुरी असतांना देखील ठेकेदाराने फलक लावलेले नाही. नांदगाव ते चाळीसगाव च्या दिशेने चालू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी जळगाव खु ||. या गावाजवळ रस्त्याचे काम करणारे ठेकेदारांचे मुख्यालय असून येथून जवळच आज पर्यंत रस्त्यांच्या कामामुळे अपघातात जखमी होऊन चार ते पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. रस्त्यावर काम करणारे मजूर प्रवाशांना उध्दव वागणूक देतात. तसेच रस्त्याच्या कामावरील ढंपर पाण्याचे टँकर, ट्रँक्टर इत्यादी वाहने रस्त्यावर उभे करुन देतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळे निर्माण होतात,तरी या कडे रस्ते निर्मितीच्या महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गाकडून होत आहे.
तालुक्यातील मनमाड येथील भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांचे शेकडो टँकर दररोज याच मार्गाने विविध ठिकाणी तसेच मराठवाड्यात दूरपर्यंत पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करतात तसेच वरील जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि तालुक्यांंच्या ठिकाणी व तालुका अंतर्गत ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणार्या परिवहन मंडळाच्या बसेस व इतर खाजगी दुचाकी, चारचाकी, रिक्षा, अवजड वाहतूक करणारे शेकडो वाहने या रस्त्याने दररोज जातात. रस्त्यांच्या आणि पुलांच्या कामासाठी अनेक ठिकाणी बाजूने काढलेले तात्पुरते डायव्हरशन मुरूम आणि मातीचा वापर करून तयार केलेले असल्याने मोठ्या प्रमाणात धुळ उडाल्यावर त्याचा त्रास होतो. वरील रस्त्याचे काम चालू असल्यामुळे हजारो वृक्षांची कत्तल झाल्याने दुर पर्यंत विसावा घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा सावलीसाठी मोठे झाडे दिसेनाशी झाली आहे, तरी रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचे टँकर तसेच मजूर असल्यामुळे आहे तरी विविध प्रजातीची झाडांची लागवड करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून प्रवाशी वर्गाकडून तसेच नागरिकांकडून होत आहे.