B-N-N
बिंदास मिडीया
सौरभ लाखे
वैजापूर पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी ( ता. ०२) रोजी प्रा. राम बाहेती यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक मेळावा पार पडला. यावेळी विचारमंचकावर जिल्हा सचिव कॉ. अनिल जावळे, राज्य कौन्सिल सदस्या तथा तालुकाध्यक्ष कॉ. शालिनी पगारे, उपाध्यक्ष शबाना शेख, शोभा तांदळे, पंचशीला धनेश्वर यांची यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून करण्यात आली. प्रा. बाहेती म्हणाले की, आयटकच्या माध्यमातून देशपातळीवर कामगार, श्रमिक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सातत्याने प्रश्न मांडण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविका १०० रु मानधन घेत होती संघटनेच्या सततच्या लढ्यामुळे आता ८.५०० रु मानधन घेते आहे.
एकरकमी लाभ मिळतो आहे. आहाराच्या बिलमध्ये ५ रु वरून ५ रु प्रति लाभार्थी मिळत आहेत. आपल्या एकजुटीमुळेच आपण लढतो आणि जिंकतो सुद्धा. अंगणवाडी सेविकांना मिनी सेविका यांना समान वेतनश्रेणी सरकारकडून मिळवायची आहे. अनेक मागण्या संघटनेने पूर्ण करून घेतल्या असल्या तरी वेतनश्रेणी, सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, पेन्शनची मागणी, रिक्त पदांचा प्रश्न आणि इतर राज्या प्रमाणे मानधनाची करण्यात येत असलेल्या मागण्यांसाठी सर्व सेविकांना संघटित होऊन तीव्र लढा द्यावाच लागणार असल्याचे ते म्हणाले.
आयटक ने आत्तापर्यंत कुठलेही खोटे आश्वासन देऊन किंवा फसवणूक करून कार्यकर्त्यांसाठी एकनिष्ठतेने लढा दिला आहे त्यामुळे आयटक हीच तुम्हाला न्याय मिळवून देणारी संघटना असल्याचे कॉ. अनिल जावळे म्हणाले. आयटक हि संघटना फक्त राज्य पातळीवर काम करत नाही तर देशपातळीवर व केंद्रातही अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मांडत असते त्यामुळे सर्वांनी आयटकच्या छताखाली एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन कॉ. शालिनी पगारे यांनी केले. प्रास्तविक व सूत्रसंचालन शालिनी पगारे यांनी केले. यावेळी मीना पवार, कल्पना माळी, सोनी चव्हाण, सुनीता भागवत, संजीवनी पंडागळे, सुरेख तांबे, शैला बोऱ्हाडे, सुरेखा जगधने, योगिता व्यवहारे, संगीता सोनवणे, संगीत खमीतकर, ज्योती खडके, मंदाकिनी जाधव, संगीत गव्हाळे आदींसह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
बिंदास मिडीया
सौरभ लाखे
वैजापूर येथे आयटकच्या अंगणवाडी सेविकांचा वार्षिक मेळावा संपसंघटित क्षेत्र दिवसेंदिवस घटत असून असंघटित क्षेत्राची व्याप्ती वाढत असल्याने संघटित कामगारांचे हाल होत आहेत. पेन्शन, श्रेणी, सेवा सुरक्षेचे प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने त्यांचे प्रश्न वाढले आहेत. अंगणवाडी सेविकांचा प्रलंबित मागण्यांकडेही सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने तुमच्या न्याय, हक्क मागण्यांसाठी व्यवस्थे विरुद्ध लढा सुरूच ठेवावा लागणार असल्याचे आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रा. राम बाहेती यांनी सांगितले. संघटनेच्या वार्षिक मेळाव्या प्रसंगी वैजापूर येथे ते बोलत होते.