चिश्तीया महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा* *योजना तर्फे खुलताबाद* *शहरात सफाई अभियान

0
BNN
बाबासाहेब दांडगे 
खुलताबाद 




खुलताबाद  -- 
चिश्तीया कला व विज्ञान महाविद्यालय खुलताबाद व नगर परिषद, तहसील  कार्यालय,दर्गा कमेटी, पत्रकार संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक खुलताबाद शहरात सफाई अभियान मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. 
 *खुलताबाद तालुक्याचे तहसीलदार श्री* *राहुल गायकवाड* *यांच्या प्रेरणेने* *खुलताबाद शहरात सफाई मोहीम* *राबविण्यात आली.*  
खुलताबाद येथील ऊरूस मैदान येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी श्री राहुल गायकवाड, नगराध्यक्ष मुकीमोद्दीन कमर,मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती भगत-पाटील, प्राचार्य डॉ शेख इजाज, मुनीबोद्दीन मुजीबोद्दीन (नगरसेवक ),सईदा बी (नगरसेविका), अॅड. कैसरोद्दीन,शरफोद्दीन मोहम्मद  रमजानी,  फजीलत अहमद,सुनील घोडके (पत्रकार),महम्मद नईम (पत्रकार),रफीयोद्दीन रफिक (पत्रकार), डाॅ गणी पटेल, अर्चना गायकवाड व शिल्पा थोरात (सारथी तारादूत),कार्यक्रम अधिकारी प्रा सुनील जाधव व सिद्दीकी अफरोजा, प्राध्यापक वर्ग,  राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, नगरपालिका कर्मचारी, यांनी साफ-सफाई मोहिमेत मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला. *यावेळी  दोन*   *टॅक्टर व दोन घंटा गाडी कचरा* *व प्लास्टिकचा कचरा जमा* *करण्यात आला.* 

यानंतर मुख्य कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले.कार्यक्रम प्रस्तावित डाॅ शेख इजाज यांनी केले, यावेळी नगराध्यक्ष मुकीमोद्दीन कमर, अॅड. कैसरोद्दीन, डाॅ गणी पटेल, अर्चना गायकवाड (सारथी तारादूत)यांनी मनोगत व्यक्त केले. 
अध्यक्षीय भाषण तहसीलदार श्री राहुल गायकवाड यांनी केले. यावेळी आपल्या भाषणात तहसीलदार गायकवाड म्हणाले आज आरोग्य दृष्टीने साफ सफाई महत्त्वाची आहे. माणसाच्या मनातील स्वच्छता झाली पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून काम केले पाहिजे. खुलताबाद ऐतिहासिक शहर आहे , या शहराला ऐतिहासिक वारसा आहे याचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाने स्वतःला झोकून काम केले पाहिजे. आपण आपले संस्कार जपले पाहिजे व तेच संस्कारांचा बिजं पेरले पाहिजे हे महत्त्वाचे .प्लास्टिक मुक्त झाले पाहिजे  ही काळाची गरज आहे यासाठी व्यापारी यांनी सहकार्य केले पाहिजे, व व्यापाऱ्यांना या चळवळीत सामावून घेतले पाहिजे त्यांचे प्रबोधन होणं गरजेचे आहे. आपला कचरा याची विल्हेवाट आपणच लावली पाहिजे व कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने झाली पाहिजे.साफ सफाई व प्लास्टिक मुक्त हे अनेक ऊदाहरणासह पटवून दिले. 
 *मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती* *भगत-पाटील यांनी* *स्वच्छतेची शपथ दिली.

 *राष्ट्रीय सेवा योजना सामाजिक भान* *ठेवून एड्स चाचणी घेण्यात* *आली* खुलताबाद सरकारी दवाखाना येथील संध्या दिक्षीत व सुरेखा सुरवसे यांनी एड्स चाचणी तपासणी करण्यात आली. कार्यक्रम सूत्रसंचालन प्रा सुनील जाधव यांनी केले तर आभार डाॅ सिद्दीकी अफरोजा यांनी मानले. 
कार्यक्रम यशस्वीसाठी प्रा  भनगे शैलेंद्र, डाॅ बागल सुभाष, डाॅ पवार आसाराम, प्रा मुजाहेद ऊर रहेमान, डाॅ रामटेके पुरुषोत्तम,  डाॅ भालेराव अशोक, डाॅ देशपांडे शिल्पा, प्रा शेख शाईस्ता  डाॅ मोहम्मद अली, प्रा शफीयोद्दीन रजवी, डाॅ नदाफ अस्लम, डाॅ  सय्यद इक्बाल मजाज,प्रा पठाण खलील, सैफ जैदी,  प्रा शेख फिरोज वाघ एस.बी.मोहम्मद रियाजोद्दीन, संदेश केरे यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top