B.N.N
अरुण हिंगमिरे- मालेगाव, नाशिक
मालेगाव कळवण रस्त्यावरील मेशी फाटा नजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीत प्रवाशांनी भरलेली बसचे पुढचे टायर फुटल्याने समोरून येनार्या एका रिक्षाला धडक देऊन रिक्षासह रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीचे कठाडे तोडून विहिरीत पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान वरील दुर्दैवी घटना समजताच आमदार राहुल आहेर हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्यात सहभागी झाले. दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मदतकार्य सुरु करुन बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. या बसच्या खाली एक रिक्षा देखील अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. या अपघातात ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता असून ३० ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत. धुळे कळवण ( एम एच ०६ ८४२८ ) ही बस मालेगावहून कळवणच्या दिशेने जात असतांना मेशी फाटा येथे हा अपघात घडला आहे.
बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने की बसचा टायर फुटल्याने बस विहिरीत कोसळली यामागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या बसच्या खाली एक प्रवाशी रिक्षा देखील अडकल्याची महिती व्यक्त होते आहे. त्यामुळे जखमी व मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले आहे. यासह आमदार राहुल आहेर, पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका देखील बचावासाठी दाखल झाल्या आहेत. दोन क्रेन मशीन्सच्या सहाय्याने बस विहिरीतून काढण्याचा प्रयत्न सुरु असून आत्तापर्यंत ३५ ते ४० जखमींना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना मालेगाव व देवळा येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. घटनास्थळावर सध्या बचावकार्य सुरु आहे. जखमींवर देवळ्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर नाशिकहून जिल्हा रूग्णालयाच्या पाच गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत.