नांदगाव बोलठान रस्‍त्‍यावर जीप पलटी झाल्याने आठ जण जखमी

0
नांदगाव बोलठान रस्‍त्‍यावर जीप पलटी झाल्याने आठ जण जखमी

B.N.N
अरुण हिंगमिरे
जातेगाव, नांदगाव

 नांदगाव तालुक्यातील बोलठाण रस्त्यावर सोमवार दि 13 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जीप पलटी झालेले आठ जण किरकोळ जखमी झाले समजते
जखमींना खाजगी रुग्णालयात उपचार करून घरी पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.


 सविस्तर वृत्त असे की, नांदगाव बोलठानच्या दिशेने महिंद्रा मॅक्स क्रमांक एम.एच.१५ / बि.डी. ५६७३ ही जीप आठ प्रवासी घेऊन येत असतांना कुसूमतेल गावा पासून एक कि. मी. अंतरावर गाडीचे स्टेरींग अचानक जाम झाल्याने वरील नंबरची जीप रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत तीन वेळा पलटी झाली, 


सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने आतील प्रवाश्यांपैकी काहींंना किरकोळ मुका मार लागला तर काही प्रवासी जखमी झाले. त्यांना बोलठाण व नांदगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करुन रवाना केले आहे. दरम्यान वरील घटणे बाबत पोलीस ठाण्यात चौकशी केली असता सदर घटणेची तक्रार दाखल करणे बाबत कोणी आले नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top