B.N.N
अरुण हिंगमिरे
नाशिक
पुण्यश्लोक बहुद्देशीय संस्था, नाशिक यांच्या वतीने सामाजिक, व्यवसाय, पत्रकारिता, क्रिडा ई क्षेत्रात काम करणाऱ्या कुबेर जाधव देवळा तालुका, राजेंद्र सोनवळकर दौड पुणे, सौ. मीनाताई जानराव औरंगाबाद, कृष्णा जाधव देवळा, जमीर मन्सुरी सायखेडा, रामदास ढोबरे बागलाण, गणेश बत्तासे कोपरगाव, शरद गाढे चांदवड, योगेश चिखले नाशिक,
बाजीराव कमानकर भेडाळी या समाज दुताना गोदा युवा सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समाजिक तसेच पुण्यश्लोक दिनदर्शिका 2020 प्रकाशन करण्यात आले.
महापुरूषाचे विचार सर्व सामान्य व तळा गळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ह्या माध्यमातून होत असुन सामाजिक व ईतर क्षेत्रात काम करत असतात अनेक संघर्ष करावा लागतो हे आम्ही जाणत असुन, प्रामाणिक पणे काम करण्यार्या समाज दुताचा सन्मान झाला पाहिजेत.हाच प्रामाणिक हेतु समोर ठेवून संस्था गेल्या पाच वर्षांपासून पुरस्कार वितरित करत असल्याचे यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब ओहळ यांनी सांगितले.
ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपचे उपाध्यक्ष श्री भैय्या साहेब बडगर धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष श्री. बापु साहेब शिंदे धनगर समाज्याचे जेष्ठ नेते श्री शिवाजी दादा ढेपले धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री सुदाम अण्णा लोंढे टायगर ग्रुपचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर धसे, टायगर ग्रुपचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सचिन जाधव, कोपरगावचे युवा उद्योजक दिपक कादळकर, धनगर समाज संघर्ष समितीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री.गोरख गाढे बेहेड चे सामाजिक कार्यकर्ते दत्तु देवकर संस्थेचे अध्यक्ष अशोक चिखले, उपाध्यक्ष उत्तम पाबळे खजिनदार संतोष पल्हाळ, कार्यकारी अध्यक्ष दिपक जाधव, वैभव जाधव, खंडेराव दैने, संदिप ओहळ, लखन शिंदे, अभिजीत बुचूडे, सोनु गावले, निरज काडेकर, पिसाळ सर, अण्णा ढेपले सह पचंकोषीतील नागरिकमोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री गोरख जाधव यानी केले तर आभार संस्थेचे संघटन श्री कैलास आडभाई यानी माडले.