B.N.N
अरुण हिंगमिरे
नांदगाव, नाशिक
नांदगाव येथील जे. टी कासलीवाल इंग्लिश मिडीयमच्या बालकांच्या कलागुणांचे सादरीकरण"रॉकस्टार"या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करण्यात आले.
शास्त्रीय नृत्य,प्लास्टिक बंदी, नाटिका, नव्या जुन्याची सांगड देशभक्तीपर नृत्य व गीत यांच्या सादरीकरणाने मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षक व प्रमुख पाहुण्यांची मने जिंकून घेतली. टाळ्यांचा कडकडाटने बालकलांकरांचा आनंद द्विगुणित होत होता .देशभक्ती गीतांनी एक आगळा वेगळा जोश निर्माण झाला.
बालकलाकरांचे कौतुक करण्यासाठी संस्थेचे चेअरमन सुनीलकुमारजी कासलीवाल, कमलाकाकीजी कासलीवाल, संस्थेचे सचिव विजय चोपडा, डॉ. अनिल कासलीवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदिवाल, अंकुर कासलीवाल प्रशासक गुप्ता सर, प्राचार्य मॅथीव मुख्याध्यापक राजेंद्र खरोटे,विशाल सावंत, उपमुख्याध्यापक गोरख डफाळ उपस्थित होतेकार्यक्रमास शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चोळके सर व काळे मॅडम यांनी केले तर विद्यार्थी सूत्रसंचलन कुणाल गुप्ता, ओम लोहाडे, सृष्टी बोरसे , अथर्वपरदेशी, वैष्णवी पाटील शीतल सरोदे , तृप्ती पठाडे, तनिष्का गुप्ता, रोजी कोलगे यांनी केले. आभार शरद सावंत यांनी व्यक्त केले.