नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षणाची ऐशी की तैशी तांबेवाडी येथे शाळेचे वर्ग भरतात मंदिरात !!

0


B.N.N
अरुण हिंगमिरे
टाकळी बु.- तांबेवाडी, 
नांदगाव नाशिक.

नांदगांव तालुक्यातील टाकळी बु|| अंतर्गत असलेल्या तांबेवाडी ही वस्ती सध्या चर्चेचा विषय ठरत असुन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्गखोल्यांंची दुरवस्था झालेली असल्याने येेथील १०३ पटसंख्या असलेेेली जिल्हा परिषदेच्या प्राथमीक शाळेचे पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग येथील विठ्ठल मंदिरात, हनुमान मंदिरात आणि समाज मंदिरात व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाच्या घरी भरत असल्याचे समजते . 
याबाबत अधिक चौकशी केली असता, असे समजले की, सध्या तांबेवाडी येथील लोकसंख्या साधारण८०० ते एक हजार असून येथील प्राथमिक शाळेस एक षटकोनी वर्ग आहे. त्यातच या ठिकाणी जवळपास 103 पटसंख्या असुन पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरतात आहे, त्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झालेली असुन अर्ध्या इमारतीच्या पडवीचा स्लॅब नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना ऊन वारा पाऊस याचा त्रास होता यावर उपाय म्हणून शालेय शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व शिक्षक आणि ग्रामस्थांनी मार्ग काढत सध्या शाळा गावच्या मंदिरांंमध्ये भरवली जात आहे. टाकळी बु ||. अंतर्गत येत असलेली तांबेवाडी ही वस्ती मनमाड पासून २५ किलोमीटर आणि नांदगाव या तालुक्याच्या गावापासून पासून हाकेच्या अंतरावर म्हणजे १२ किलोमीटर अंतरावर आहे.


सध्याच्या स्पर्धेच्या युगात आधुनिक अध्यापन पध्दती व दर्जेदार शैक्षणिक साहित्य ,इ लर्निंग यासारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण दिले जाते.यात जिल्हा परिषदेच्या शाळा देखील मागे नाहीत
परंतु तालुक्यातील तांबेवाडीच्या 103 विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी साधे वर्गखोल्या सुद्धा नाही याबाबत खेद व्यक्त करत या सर्व गोष्टींपासुन वंचित राहून मंदिरात आणि उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली थोडेफार नाही तर तब्बल तीन वर्षांपासून तांबेवाडीची शाळा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात, मारुतीच्या मंदिरात, समाज मंदिरात आणि शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष रमेश गोयेकर यांच्या घरी भरत आहे.याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून आमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत लवकरात लवकर शाळेचे वर्ग उपलब्ध करून देण्याची मागणी पालक ग्रामस्थ यांच्यासह शिक्षकांनीही केली आहे. 
तालुक्यास गटशिक्षणाधिकारी नसल्याने प्रभारी कार्यभार सांभाळत असलेल्या श्रीमती नंदा ठोके यांच्याशी चर्चा केली असता यु डायस प्रमाणे मागणी केलेली आहे निधी उपलब्ध झाल्यावर नवीन वर्ग व नुतनीकरण करण्यात येईल असे सांगितले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top