B.N.N
अरुण हिंगमिरे
नांदगाव, नाशिक
नांदगाव येथून बोलठाण कडे जाण्यासाठी एसटी बसेस वाढविण्याची त्याचप्रमाणे नांदगाव येथील रेल्वे फाटकापासून बस सुविधा सुरु करावी अशी मागणी प्रवाशांनी व परिसरातील नागरिकांनी केली आहे,
नांदगाव येथून बोलठाण या रस्त्यावर पोखरी, जळगाव, मानीकपुंज फाटा, कासारी, कुसूमतेल, ढेकू खु || व बु || ,जातेगाव इत्यादी गावे असून नांदगाव आगारातुन सकाळी ५.४५, व ७.३० वाजता कन्नड येथे जानारी बस त्यानंतर ९ वाजता सुटनारी बोलठाण पर्यंतची टपाल गाडी ती नियमित सुरु पाहिजे मात्र ती गाडी अनेकवेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने रद्द केली जाते. पर्यायाने त्यादिवशी पोष्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे असलेली टपाल पोहचविण्यासाठी आणि येनारी टपाल घेऊन येण्यासाठी स्वतः नांदगाव येथे जावे लागते.
त्यानंतर दुपारी १२.३० वाजता कन्नड येथे जानारी बस, ४.४५ वाजता नाशिक येथून आलेली बस बोलठाण कडे रवाना, आणि ६.३० व ८.३० बोलठाण येथे मुक्कामी असणाऱ्या अशा बोटावर मोजता येतील इतक्या सात बस आहेत. ह्याच बस बोलठाण येथून सकाळी ५.४५ वा.,६.३० वाजता नाशिक येथे जानारी बस त्यानंतर ७.३० वा. , १०.१५ वा. ११.४५ वा. कन्नड- नांदगाव, आणि ३.४५ वा पुन्हा कन्नड- नांदगाव, आणि बोलठाण येथून नांदगाव कडे शेवटची परत जानारी सहा वाजताची बस अशा दिवसभरात फक्त सात बस जातेगाव, बोलठाणच्या दिशेने धावतात. या व्यतिरिक्त मानव विकास मिशन अंतर्गत शाळेच्या मुलांसाठी असलेल्या दोन बस त्या शाळेला सुट्टी असेल त्यादिवशी रस्त्यावर धावत नसतात, आणि ज्यादिवशी असतात दिवशी सुध्दा आगोदर विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देतात आणि ते योग्य आहे.
पुर्वी याच चाळीस किलोमीटर अंतरासाठी सध्या सुरू असलेल्या बसेसच्या व्यतिरिक्त आनखी जादा दोन बस नांदगाव येथील रेल्वेच्या फाटकापासून दर एक तासाच्या अंतरावर होत्या, त्यामुळे नांदगाव ते बोलठाण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सुरु असलेली अवैध प्रवासी वाहतूकीस आळा बसला होता. आणि परिवहन मंडळाच्या तिजोरीत महसुलात वाढ झाली होती. परंतु सकाळी नऊ वाजेच्या नंतर साडेतीन तास आणि साडेबारा वाजेच्या नंतर सव्वाचार तास मध्ये प्रवाश्यांना बस सुविधा नसल्याने मागील काही वर्षांपूर्वी पासून अचानक परिवहन मंडळाच्या नांदगाव येथील आगाराने बंद केल्याने मोठ्या प्रमाणात पुन्हा अवैध प्रवासी वाहतूकीने डोके वर काढले आहे. तरी अवैध प्रवासी वाहतूकीस आळा घालण्यासाठी नांदगाव येथील रेल्वे फाटकापासून पुन्हा परिवहन महामंडळाने बस सुविधा सुरु करावी, त्यामुळे घाटमाथ्यावरील नागरिकांना नांदगाव शहरातील, तसेच पोलीस ठाण्यातील, तहसील कार्यालयातील, पंचायत समिती मधील या सह इतर कामे करून परत येण्यासाठी सोईस्कर होईल आणि अवैध प्रवासी वाहतूक करणार्यांना आळा बसेल, अशी मागणी घाटमाथ्याहुण होत आहे.