B.N.N
अरुण हिंगमिरे
जळगाव, नांदगाव
नाशिक.
नांदगाव तालुक्यातील जळगाव 'खु' येथे राजमाता जिजाऊ याच्या जयंती निमित्ताने दि.१६ जानेवारी गुरुवारी गावातील महिला बचतगटाच्या तसेच सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या महिलांना येथील तरुण मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करुन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित तालुक्यातील राजकीय क्षेत्रात ज्यांनी आपल्या कार्यकतृत्वाने ठसा उमटवला अशा नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनीताई आहेर आणि पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या शेलार, पंचायत समिती सदस्या अर्चना वाघ, यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
त्यांंचे जळगाव खु. येथे आगमन होताच त्यांचे येथे ढोलताशांच्या गजरात प्राथमिक शाळेच्या विध्यार्थीनींंनी लेझीमच्या ठेका धरत जल्लोषात स्वागत केले यावेळी तरुण मित्रमंडळींंसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावर दीप प्रज्वलित करून सरस्वती पूजन करून आणि राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्याचा मानस मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या गावात बहुसंख्येने बचत गट निर्माण झाले आहे. स्वतः रोजगार निर्माण करून अनेक महिलांना रोजगार ही निर्माण झाला आहे. त्यामुळे महिलाचे फक्त चूल आणि मूल एव्हढेच विश्व नसून त्या व्यावहारिक बनल्या आहे. आशा महिलांचा सत्कार करून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतुने राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांचा गौरव करण्यात आला असल्याचे तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले
या प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती अश्विनीताई आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जिजाऊंच्या व सावित्रीबाईची प्रेरणा घेऊन महिलांनी आदर्श घेतला पाहिजे तसेच महिलांचे अधिकार व महत्व पटवून सांगितले. या वेळीगटविकास अधिकारी गणेश चौधरी, विलास झाल्टे, पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर, अंबादास सरोदे मेजर आदी सह मोठ्यासंख्येने बचत गटाच्या महिला व गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच प्रवीण उबाळे, उपसरपंच रावसाहेब सरोदे, संकेत कदम, रामेश्वर सरोदे, झुलाल सरोदे, संतोष सरोदे, अशोक रंधे, भैय्यासाहेब सरोदे, रघुनाथ टिळेकर, निबा डोखे, शिवरुद्र ग्रुपचे संतोष कमोदकर, विजय टिळेकर, सुरज डोखे, भैय्या वाघ, कृष्णा सरोदे, ज्ञानेश्वर रंधे, गणेश सरोदे, शुभम मोकळ, लखन सरोदे, आदींनी परिश्रम घेतले.