राज्य डॉजबॉल स्पर्धेत उस्मानाबाद , कोल्हापूरची बाजी- वेरुळला राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा संपन्न

1 minute read
0
BNN
बाबासाहेब दांडगे



वेरूळ - येथील श्री संत जनार्दन स्वामी विद्यालयात राज्य डाॅजबाॅल सबज्युनियर मुले/मुली स्पर्धा दि 12 जानेवारी ते 14 जानेवारी या दरम्यान आयोजन समिती अध्यक्ष श्री राजेंद्रजी  पवार , शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जिल्हा डाॅजबाॅल संघटना औरंगाबाद सचिव प्रा.एकनाथ साळुंके यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न होत मंगळवारी अंतिम पूर्व व अंतिम स्पर्धा पार पडून बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मुलांच्या डॉजबॉल संघामध्ये  प्रथम क्रमांक उस्मानाबाद संघाने .


 द्वितीय क्रमांक जळगाव संघाने तर तृतीय क्रमांक बुलढाणा व अकोला सामुदायिकरीत्या मिळविला तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक कोल्हापूर संघाने , द्वितीय क्रमांक पिंपरी चिंचवड पुणे संघाने तर तृतीय क्रमांक मुंबई उपनगर संघाने मिळवला यावेळी विजेत्या संघांचा बक्षीस वितरणाचा सोहळा श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  रामानंदजी महाराज , पंकज भारसाखळे उपाध्यक्ष महाराष्ट्र हॉकी संघटना , अध्यक्ष जिल्हा ऑलिम्पिक संघटना औरंगाबाद , चंदन इमले पोलीस निरीक्षक 


खुलताबाद , अनिता बागुल पोलीस उपनिरीक्षक क्रांती चौक पोलीस स्टेशन औरंगाबाद , हनुमंतराव लुंगे  सचिव म रा डॉजबॉल संघटना , प्रा एकनाथ साळुंके शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त , जिल्हा सचिव डॉजबॉल संघटना औरंगाबाद , मोहम्मद अझरुद्दीन प्राचार्य अल इरफान हायस्कूल , आयोजन समिती अध्यक्ष राजेंद्र पवार , तालुका क्रीडा संयोजक आशिष कान्हेड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला तसेच विजेत्या संघांना ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडूबा हारदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा एकनाथ साळुंखे यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top