B.N.N
अरुण हिंगमिरे
नांदगाव,नाशिक
शहरातील नामांकित व्ही.जे.हायस्कुल मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते.त्या कार्यक्रमाचे उदघाटन संतोष कांदे यांचे हस्ते करण्यात आले.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक संचलित व्ही.जे. हायस्कूल प्रशासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यास्तव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज केले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन पत्रकार संतोष कांदे यांनी दीप प्रज्वलन करून केले.त्यानंतर येथे कासारी,न्यायडोंगरी ,पोखरी ,तांदुळवाडी ,जळगाव बुद्रुक,जळगाव खुर्द,गंगाधरी,मल्हारवाडी ,वाखारी,जाटपाडे,मांडवड अशा विविध गावांतून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शाळेत येत असतात.या मुलांमध्ये जे कला,क्रीडा गुण असतात त्यांना शहरी मुलामध्ये संधी मिळत नाही यासाठी मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे व भैय्यासाहेब चव्हाण व शालेय समितीचे अध्यक्ष संजीव धामणे यांच्या संकल्पनेतून या मुलांमध्ये असलेले कलागुण सादर करण्याची संधी मिळावी,यासाठी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी विविध खेळ घेण्यात आले.दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक या कायर्क्रमात ग्रामीण भागातील विद्यार्थांनी विविध गीतावर नृत्य सादर केले.तसेच विविध गीत गावून सर्वांचे मने जिंकली याप्रसंगी ग्रामीण भागातील बहूसंख्येने पालक उपस्थित होते .
संस्कृती कायर्क्रमाचे उद्घाटन पत्रकार संतोष कांदे याच्या हस्ते करण्यात आले.या कायर्क्रम प्रसंगी मंचावर पर्यवेक्षिका प्रतिमा खैरनार,जेष्ठ शिक्षक भास्कर जगताप , शिक्षकप्रतिनिधी दिपाली सांगळे संस्कृती प्रमुख गुलाब पाटील,संगीता शिंदे उपस्थित होते. कायर्क्रमाचे सुत्रसंचलन निवेदिता सांगळे यांनी केले. कार्यक्रमास यशस्वीतेसाठी मंगेश सरोदे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.