B.N.N
अरुण हिंगमिरे
जातेगाव, नांदगाव
नांदगाव तालुक्यातील लोढरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते, यावेळी विद्यार्थ्यांनी गाव, वाडी- वस्तीहुन भाजीपाला, हरभर्याचा हुरडा, चहा, रानभाजी, फळे, भाजीपाला विक्रीसाठी आणला होता
त्याचप्रमाणे नास्त्यासाठी मिसळ पाव, चहाचे दुकान मांडले होते . तसेच आनंद मेळाव्यात ज्या विद्यार्थ्यांनी आपला माल विक्रीसाठी आनला होता त्यांनी आकर्षण वेशभूषा केली होती. मुलांनी धोतर टोपी तर मुलींनी लुगड्याचा वेष परीधान करून विक्रेते बनले होते.
या मेळाव्यात साधारणपणे 40-42 मांडण्यात आले होते, विद्यार्थ्यांनी आपली दुकान थाटण्यापासुन आवश्यक सर्व साहित्यांची जुळवाजुळव स्वतःच केली होती. या मेळाव्याच्या निमित्ताने लोढरे गावात प्रथमच गाव बाजार भरल्यामुळे गावकर्यांनाही फारच आनंद झाला होता. मुलांनी आनंद मेळाव्याच्या निमित्ताने भरविलेल्या बाजारात खरेदी करण्यासाठी स्वत: सरपंच सरपंच संयोग निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय निकम, उपसरपंच गुलाब निकम, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा सारिका निकम त्याच प्रमाणे पालकांनी आणि नागरिकांनी तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून भाजीपाल्यासह इतर वस्तू खरेदी केल्या. अनेकांनी सकाळच्या गारव्यामध्ये चहाचा आस्वाद घेतला तर काहींनी मिसळ पोह्यांचा नास्ता केला .अनेकांनी स्वस्तात उपलब्ध असलेला कांदा खरेदी करण्यास पसंती दिली.निवडक विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केली. काहींनी गीतगायन करुन मनोरंजन केले.
बाल आनंदमेळावा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर राठोड. विलास जुंधरे. संजय आहेर. ईश्वर मुठे. मकरंद कंचार. श्रीमती. शितल चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.
सरपंच संयोग निकम. सचिन निकम. दत्तात्रय निकम रविंद्र निकम, कल्याण निकम, माजी सरपंच अरूण निकम, संतोष निकम यांनी वरील उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी रोख स्वरुपात बक्षीस वितरण केले. या प्रसंगी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यामागे बाजाराच्या विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय वृत्ती विकसित होऊन व्यवहारिक ज्ञान मिळावे व श्रमप्रतिष्ठा जोपासावी हा उद्देश असल्याचे मुख्याध्यापक संजय आहेर यांनी सांगितले