B.N.N
अरुण हिंगमिरे
चंदनपुरी, मालेगाव
नाशिक
बानुबाईचे माहेर असलेले मालेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे शुक्रवारी दिनांक १० जानेवारी पासून भंडाऱ्याची आणि खोबर्याची उधळण करून येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय असा जयघोष खंडेराव महाराजांच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे.
प्रथेनुसार सकाळी श्री खंडेराया बानू बाई व म्हाळसाई यांचे मुखवटे पालखी ठेवून मानाच्या काठ्यांची मिरवणूक निघते उत्तर महाराष्ट्राची प्रति जेजुरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे शुक्रवार पासून पंधरा दिवसांच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे.
सालाबादप्रमाणे गुरुवारी जेजुरी येथून पदयात्रेने सुमारे आडिचशे युवकांनी श्रीक्षेत्र जेजुरी येथून सुमारे ३५० किलोमीटर येथील तरुणांनी पाई चालत मशालजोत घेऊन आले होते, त्यांचे भाजपाचे गटनेते सुनील गायकवाड, भाजपा प्रदेश सदस्य नितीन पोफळे, जिल्हाध्यक्ष विवेक वारुळे आणि ग्रामस्थांनी स्वागत केले, त्यानंतर मंदिरापर्यंत सवाद्य मशालीची मिरवणूक काढण्यात आली होती. तेथे विधीवत पुजा आराधना करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी सात वाजता देवांच्या मुखवटे पालखीमध्ये विराजमान करुन मिरवणूक काढण्यात आली होती, प्रथेप्रमाणे पुढे मानाच्या काठ्या व अश्वपथक होते, यावेळी हजारो मल्हार भक्त सहभागी होऊन खोबरे व भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय अशी घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात गावातून प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली होती.
मिरवणुकीत सरपंच योगिता अहिरे जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील माजी सरपंच राजेंद्र पाटील आदींसह राजकीय सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
भंडार्याच्या उधळणीत न्हाऊन निघालेल्या मल्हार भक्तांनी वाजत गाजत पालखी मिरवणूक मंदिर परिसरात आणली. त्यानंतर कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सपत्नीक देवाची तळी भरली व महापूजा आणि आरती केली त्यांच्यासमवेत अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे आणि शासकीय कर्मचारी देखील सहभागी झाले होते. यावेळी भक्तांनी येळकोट येळकोट जय मल्हार बोला खंडेराव महाराज की जय असा जयघोष करत आसमंत दुमदुमून सोडला होता.
पहिल्याच दिवशी सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतल्याचा अंदाज देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आला यात्रेत मोठे पाळणे उपाहारगृह प्रसादाची दुकाने भंडारा आणि मनोरंजनाची सुमारे 500 हून अधिक दुकाने थाटलेली आहे शनिवार व रविवार लागून सुट्टी आल्याने या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे त्यादृष्टीने प्रशासन आणि वाहतूक व पाण्याची व्यवस्था केलेली आहे.