गंगापूर पंचायत समिती मधील सेना व भाजपा कडे प्रत्येकी ९ सदस्य असल्याने ही निवड रंगतदार ठरली आहे.mh bindass

0
B.N.N गंगापूर
खलील पटेल

गंगापूर पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटल्याने या पदासाठी सेना भाजपाची रस्सीखेच नव्हे, तर घोडेबाजारी रंगली असल्याने या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. आमदार प्रशांत बंब हे पद आपल्याकडे कायम ठेवण्यात अयशस्वी ठरले  शिवसेना ने.बाजी मारली.
 पंचायत समिती मधील सेना व भाजपा कडे प्रत्येकी ९ सदस्य असल्याने ही निवड रंगतदार ठरली आहे. 


गंगापूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रियेस सकाळी 11 वाजता सुरुवात झाली ही सर्व प्रक्रिया दोन वाजेपर्यंत चालली यामध्ये शिवसेनेचे 9 आणि भाजपाचे 9 असे एकूण 18 सदस्य होते यामध्ये शिवसेनेच्या सोनाली संजय पवार या गैरहजर राहिल्या तर भाजपाचे असलेले सदस्य ज्ञानेश्वर देशमाने यांनी ऐनवेळी शिवसेनेला मतदान केल्याने सभापती म्हणून सुनिता सुनिल केरे यांची निवड करून याच पद्धतीने उपसभापती संपत सोहनलाल छाजेड यांची निवड करण्यात आली 

शिवसेनेने भाजपावर कुरघोडी केल्याचे संकेत तालुक्यात पसरले
  निवडणुकीची प्रक्रिया  पाडण्यासाठी गटविकास अधिकारी विजय परदेशी कार्यालयीन प्रमुख अनिल रोकडे, विस्ताराधिकारी संदेश चव्हाण,

शिवसेना तालुका प्रमुख दिनेश मुथा,
राजु दानवे, भाऊ सांगळे,दादासाहेब जगताप,संतोष जाधव,  प्रकाश जयस्वाल लक्ष्‍मणसिंह राजपूत आबासाहेब शिरसाट भगवानसिंग राजपूत .कैलास साबणे अरविंद नहाटा. अनिल जाधव,,नितीन कांजुणे,  आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गंगापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top