बिंदास न्यूज नेटवर्क
शिवदास सोनोने
बुलढाणा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने जळगाव जामोद शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. सायंकाळी 6 वाजता तहसील कार्यालय जवळील शिवाजी महाराज पुतळ्यास माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी वंदन करून हारार्पण केले. त्यानंतर या शोभा यात्रेला सुरवात करण्यात आली. शहरातील दुर्गा चौक-चौभरा-मानाजी चौक-चावडी मार्गे पुन्हा दुर्गा चौकात आल्यानंतर या शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला. यात्रेत मोठ्या प्रमाणात शिवभक्त सहभागी झाले होते. तर शेकडो बाल गोपाल सुद्धा प्रमुख आकर्षण होते. आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी त्यांच्या सोबत ताल धरत आनंद व्यक्त केला. यंत्रे मध्ये हार ,फुल ढोल, बँड, फटाके, फेटे बांधुन शिवभक्त सहभागी होते. प्रतीक खिरोडकार यांनी शिवाजी महाराज तर अंकिता राजपूत यांनी जिजाऊ ची वेशभूषा परिधान करून घोड्या वर सवार मावळे सह सदर शोभा यात्रेची शान वाढवली.या प्रसंगी
माजी।मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे, जळगाव जामोद च्या नगराध्यक्ष सीमाताई डोबे, उपाध्यक्ष सौ सविता ताई खवणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, शहर अध्यक्ष डॉ प्रकाश बगाडे, जिल्हा महामंत्री नंदकिशोर अग्रवाल, आरती पलन, अपर्णा ताई कुटे चंदाताई पुंडे,लताताई तायडे,योगिता टापरे,पाटील ताई, मंजुषा ताई तिवारी, रत्नप्रभा खिरोडकार, नलुताई भाकरे, कलाबाई कपले, जयमाला इंगळे, राजेंद्र उमाळे, बंदुभाऊ पाटील, अशोक काळपांडे, चंदू वाघ, शाम देवताळू, संजय पांडव, चिंतामण पाठक, राजेश गोटेचा, रामदास बोंबटकार, नरेंद्र देशमुख, मिलिंद जोशी,प्रकाश पाटील, राजू हिस्साल, गोटू खत्ती, अरुण खिरोडकार, सुरेश इंगळे, रामा इंगळे, सुनील रघुवंशी, शैलेंद्र बोराडे,निलेश शर्मा, आशिष सारसर, रमेश कोथळकर, सचिन भाकरे, अजय वंडाळे,अर्पित दीक्षित, मोहित सरप, गजानन सोनटक्के यांच्यासह अनेक शिवभक्त व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम, भारत माता की जय अशी घोषणाबाजी करण्यात आली.