नांदगाव येथील कासलीवाल विद्यालयात पक्षी वाचवा अभियान

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगांव,नाशिक

 "अरे माणसा उन्हाळ्यात आमचे  पाण्यावाचून व अन्नावाचून हाल होतात रे तू काळजी घेशील काय  'या व्हॉट्स अॅप  च्या माध्यमातून येणाऱ्या  संदेशाने माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्यू ट्रस्ट चे सचिव विजयकुमार चोपडा यांच्या   संवेदनशील  मनाने ही बाब लक्षात घेतली व त्यांचे मन या मुक्या पक्ष्यांच्या भावनेने अस्वस्थ झाले. यासाठी आपण काय करू शकतो याबाबत मार्गदर्शन शिक्षकांना केले त्यांच्या या माणुसकीच्या आव्हानाला प्रतिसाद देत संस्थेच्या कमलाबाई माणिकचंद कासलीवाल माध्य  विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी  व कर्मचारी यांनी कल्पकतेने   जुन्या कॅन  व पाण्याच्या बाटल्या यांना आकार देऊन तसेच पत्र्याची भांडी बनवली तसेच पक्ष्यांना ही उन्हाळ्यात थंड पाणी मिळावे म्हणून मातीची  छोटी भांडी बनवून घेतली   विद्यार्थ्यांना पक्षी प्रेमाचा संस्कार रुजल्यामुळे   विद्यार्थी ही निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आनंदाने सहभागी होत आहे .


 गट बनवून विद्यार्थी त्यांच्या अन्न व पाणी याची व्यवस्था करत आहेत . तसेच आपल्या टिफीन बरोबर या पक्ष्यांच्या भांड्यांची पण स्वच्छता विद्यार्थी ठेवत आहे . निसर्गाबद्दल कृतज्ञता कृति द्वारे करता आल्याचा आनंद विद्यार्थ्यांत दिसून येत आहे.  दाण्या पाण्याची सोय झाल्याने विद्यार्थ्यांबरोबर आता पक्ष्यांचीपण शाळा भरल्याचा किलबिलाट झांडांवर वर  होत आहे. अपनत्व  की भावना थोडासा दाना थोडासा पाणी  या उपक्रमात प्रशांत जगधने, नितीन अहिरे, रेहान पठाण, गणेश मोरे, सुनील व्हडगर, पियूष भालेकर, गोकुळ सोनवणे, चैतन्य साठे , कल्पेश शेर, रितेश कदम , विशाल घोटेकर, तेजस घोटेकर, फैजान काझी, कृष्णा परदेशी, चेतन घोटेकर, यश साठे, शिंदे यशवंत, ठोके  जागृती,साक्षी बागोरे,  खैरणार दुर्गेश आकांशा  पगार, साक्षी मोकळ या  विद्यार्थ्यांनी उत्तम सहभाग नोंदवला तसेच त्यांना या बाबत मार्गदर्शन मुख्याध्यापक राजेंद्र खरोटे ,उपमुख्याध्यापक गोरख डफाळ किशोर बागले , संजय त्रिभुवन  , संदीप आहेर , शिवदे संजय , विजय गायकवाड , रवींद्र चव्हाण राहुल आहेर , केतन दळवी  , हर्षदा भालेराव , शरयू साळुंखे, योगिता गायकवाड  रुपाली मालकर यांनी केले
 या आदर्श उपक्रमाचे कौतुक संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल ,कमला काकिजी कासलीवाल सचिव विजय चोपडा , प्रमिलाताई कासलीवाल ,रिकबकाका कासलीवाल, सुशीकुमार कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल ,महेंद्र चांदिवाल , प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता सर यांनी अभिनंदन केle. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top