B.N.N
अरुण हिंगमिरे
नांदगाव, नाशिक
शिक्षक द्या शिक्षक द्या आमच्या शाळेला शिक्षक द्या, झोपलेले प्रशासन जागे व्हा आम्हाला हक्काचे शिक्षक द्या, शाळेला शिक्षक नसतील तर विद्यार्थी कसे घडतील असा प्रश्न उपस्थित करत तालुक्यातील पांझनदेव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी मंगळवारी दि. ११ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कार्यालय परिसर दणाणून सोडला होता.
पांझनदेव येथे पहिली ते सातवी पर्यंत मराठी माध्यमाची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून शाळेतील विद्यार्थी पटसंख्या १४१ आहे, त्यानुसार एक शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येईल असे लेखी आश्वासन पंचायत समिती प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याने आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले.
पटसंख्येनुसार पाच शिक्षकांची गरज असताना सध्या तीनच शिक्षक येथे कार्यरत आहे, त्यातही काही शालेय काम असल्यास एका शिक्षकास जावे लागते त्यामुळे
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी यांनी पंचायत समिती कार्यालय आवारात ठिय्या दिला होता याप्रसंगी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता उपस्थित पालकांनी पंचायत समिती प्रशासनाला शाळेला शिक्षक कधी देणार या प्ररश्नावर चांगलेच धारेवर धरले होते, यावेळी शिक्षण विभागाकडून तालुक्यात 203 शिक्षक संख्या रिक्त असल्याचे सांगत आपली हतबलता व्यक्त केली.
व शिक्षक नेमण्याचा अधिकार जिल्हास्तरावर असतात त्यामुळे त्यांनी वरिष्ठांकडे मागणी करून लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून देऊ सध्या तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नेमून दिले जातील असे सांगितले, परंतु पालक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी या प्रकरात हस्तक्षेप करीत प्रशासन व पालक यांचा समन्वय करीत प्रशासनाकडुन शिक्षक देण्याचे कबूल केल्यानंतर गटविकास अधिकारी गणेश चौधरी आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी नंदा ठोके यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी संदीप पाटील आण्णासाहेब पाटील सचिन थोरे जीवन पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला होता .