पत्नीसमोर फाइनांस वाल्या बाईने अपमानास्पद शब्द वापरल्याने पतिची आत्महत्या

0
B N N
समाधान घुले
सोयगाव




सोयगाव येथून जवळच असलेल्या आमखेडा गावातील एका तरुणाने कर्ज वसुली साठी आलेल्या महीलांनी पत्नी समोर अपमानास्पद शब्द वापरल्यामुळे व वसूलीतील महीलांचं पथक बराच वेळ तगादा लावत घरात बसून असल्याने गावभर झालेल्या बदनामी मुळे शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.


सागर एकनाथ गोंड(वय२७) असे आत्महत्या केलेल्या तरूणांचे नाव आहे.तो आमखेडा गावांत आपल्या कूटूंबासह राहत होता.शेती सोबतच तो ट्रॅक्टर चालवून आपला प्रपंच धकवत होता यंदाच्या खरिप हंगामात अतिवृष्टी होऊन झालेल्या पिकाच्या नूकसानी मुळे प्रायव्हेट फायनान्स कंपनी कडुन कर्ज घेतलेले होते.दर आठवड्याला  कर्जाची परतफेड करण्याची पद्धत होती.दर आठवड्याला पैशाची व्यवस्था होत नसल्यामुळे काही हप्ते थकले होते.दि.१३गूरूवार रोजी संबंधित फायनान्स कंपनी च्या महीला प्रतिनिधी सकाळी घरी आल्यानंतर कर्जांच्या हप्ता वसूली साठी तगादा लावत बराच काळ घरात बसून होत्या.यावेळी अपशब्द वापरल्यामुळे मनस्ताप होऊन त्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

संध्याकाळी साडेपाच वाजे दरम्यान ही माहिती मिळाली.सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला होता.मृत सागर गोंड यांच्या पच्श्वात एक भाऊ,आई , वडील,पत्नी व दोन मूले असा परिवार आहे.सदरील घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पूढील तपास पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर गायकवाड, दिलीप तडवी करीत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top