*आत्मचिंतन करून बौध्दिक क्षमता* *वाढवावी--प्रोफेसर राम* *चव्हाण

0
BNN
बाबासाहेब दांडगे
खुलताबाद


खुलताबाद-
विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करून बौद्धिक क्षमता सातत्याने वाढवावी त्यासाठी परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे मत डॉ राम चव्हाण यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शेख इजाज होते.
चिश्तीया महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते .त्या प्रदर्शनाचे उद्घाटन डाॅ राम चव्हाण यांच्या हस्ते  करण्यात आले या विज्ञान  प्रदर्शनात  एकूण  18 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.


उद्घाटनपर भाषणात डॉ.राम चव्हाण प्रमुख मार्गदर्शन करत होते विज्ञान विद्यार्थ्यांना खूप संधी उपलब्ध करून देत आहे आत्मचिंतन करून गुणात्मक दर्जा सतत कसा वाढवता येईल याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे आत्मविश्वास दृढ झाला पाहिजे असे आपल्या भाषणात डाॅ राम चव्हाण यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी कोहिनूर महाविद्यालयाचे डाॅ युसूफ  सय्यद  युसूफ  हुसेन , डाॅ मोहम्मद  जफर  मोहम्मद  साबीर व डाॅ  गनी पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रदर्शनाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी विश्लेषण करून आपला परफॉर्मन्स सादर केला.यावेळी प्रदर्शन उत्कृष्ट आलेल्या विद्यार्थ्यांना यांचा सत्कार डॉ.राम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. रसायनशास्त्र विभागातून प्रथम  महरिन बानो हाशम शहा, द्वितीय  नुरेन फातेमा शेख  इमाम,तृतीय  शेख रेश्मा बेगम ,गणित विभागातून प्रथम सय्यद अजर अजगर,   द्वितीय  सना फिरदोस, व तृतीय शहा आदिल  मजर शहा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला


कार्यक्रम सूत्रसंचालन प्रा अलमास  बानो व प्रा नाझनीन बेगम यांनी केले तर आभार प्रा  जमुना खंडागळे यांनी आभार मानले.
यावेळी  प्रा शेख  फैजान, डाॅ देशपांडे शिल्पा, डाॅ रामटेके पुरुषोत्तम,  डाॅ  जमाले एच एन, डाॅ भालेराव अशोक, प्रा भनगे शैलेंद्र, डाॅ खान हमीदा, डाॅ  पवार आसाराम, प्रा सुनील जाधव,  प्रा  सैफ जैदी  मोहम्मद रियाजोद्दीन, शहा हाशम  व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top