B.N.N
अरुण हिंगमिरे
जातेगाव, नांदगाव
नांदगाव आली. रविदास नगर येथे समाज मंदिरात सकाळी सात वाजेपासून स्वच्छता करुन बाहेर मंडप देउन महिलांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. त्यानंतर संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच अशोक जाधव, राजेंद्र जोनवाल यांच्या हस्ते करून आरती करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर आहेर,आप्पा त्रिभुवन, रावसाहेब खिरडकर, शंकर लाठे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चर्मकार समाजाचे अध्यक्ष विलास जोनवाल, उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, दिपक जोनवाल, शिवलाल रमने, बाबुलाल जोनवाल, सुनील जोनवाल, ज्ञानेश्वर जाधव, बंटी जोनवाल, भागीनाथ पवार, रोहिदास जोनवाल यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी तरुण आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतर सायंकाळी सत्यनारायण पूजन करून महाप्रसाद वितरण करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अरुण हिंंगमीरे