जातेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय तसेच शैक्षणिक संस्थेत आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
नाशिक

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यानिमित्ताने येथील ग्रामपंचायत कार्यालयात, जि.प.च्या प्राथमिक शाळेत व मराठा विद्या प्रसार समाजाच्या जनता माध्यमिक शाळेत आणि गंगाराम धनसींग राठोड माध्यमिक विद्यालयात प्रतिमेचे माण्यवरांच्या हस्ते पुजन करून पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.


त्याचप्रमाणे महाराजांचा सार्वजनिक जयंती उत्सव साजरा करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी सहारा सोशल गृपच्या आणि युवासेना नांदगाव तालुका प्रमुख गुलाब चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने ह.भ.प. गुरुदेव महाराज आळंदीकर यांचे शिवचरित्र्यावर आधारित किर्तणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे मागील वर्षी शिवजयंती उत्सवातील शिल्लक राहिलेल्या लोकवर्गणीतून छत्रपतींंच्या पंचधातू पासून तयार करण्यात आलेल्या अर्धाकृती पुतळ्याचे उन आणि पावसापासून रक्षण व्हावे यासाठी एक आकर्षक स्टिलची छत्री बसविण्यात आली.


तसेच बुधवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सकाळी आकर्षक फुलांची सजावट नागेश्वर मजूर सहकारी संस्था यांच्या वतीने करण्यात आली होती, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करून व पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून अभिवादन करुन राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणेने आसमंत दुमदुमून गेला होता. नंतर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जिवन चरित्र्यावर भाषन , पोवाडे आणि नृत्य तसेच सादर केले,उत्कृष्ट भाषणासाठी ईशांन चव्हाण, ऐश्वर्या डिके व वैष्णवी पवार
यांंना गौरविण्यात आले याप्रसंगी ग्रामस्थ आणि तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top