B.N.N
अरुण हिंगमीरे
मालेगाव, नाशिक
मालेगाव :तालुक्यातील सोयगाव येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात "गांधींचं करायचं काय?" नाटकाचा नुकताच प्रयोग झाला. या नाटकाला भरभरून प्रतिसाद लाभला. संजय रेंदाळकर ( इचलकरंजी ) लिखित आणि प्रतीक जाधव (कोल्हापूर) दिग्दर्शित हे नाटक मालेगाव येथील तुषार पवार, वेदांत भोकरे अवंती वाणी, दामिनी अहिरे, क्षितिजा सोनार, प्रतिक निकम, हर्षल बागुल, अक्षय बावीस्कर, कोमल सुर्यवंशी, सौरभ शिंदे, हर्षदीप अहिरे, अवनी वाणी या कलाकारांनी सादर केले. विशेष म्हणजे इयत्ता ५ वीच्या विद्यार्थीनीपासून महाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभागी आहेत. काही तर ग्रामीण भागातील आहेत.
राष्ट्र सेवा दल आणि स्मिता पाटील कलामंच, मालेगाव प्रस्तुत "गांधींचं करायचं काय? या नाटकामुळे विद्यार्थ्यांना गांधी - भगतसिंग, गांधी - आंबेडकर या व्यक्तिमत्त्वांमधील भावबंध, गांधीजींची अहिंसा, सत्याग्रह विचारधारा, गांधी विचारांची आज देशाला असलेली गरज असा अनेक बाबी समजल्या. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ मनोज जगताप, प्रा जे डी पवार यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. प्रा पी डी गोराणकर यांनी सुत्रसंचलन केले.
यावेळी राष्ट्र सेवा दलाच्या सेवा दल मंडळ सदस्य स्वाती वाणी, जिल्हा संघटक रविराज सोनार, प्रवीण वाणी, प्रा एल के कुटे, प्रा जी एम गांगुर्डे, प्रा व्ही एम देसाई, प्रा बी एम अहिरे, प्रा सी एस मोरे, प्रा ए एम पगार आदी मान्यवर उपस्थित होते.