BNN
बाबासाहेब दांडगे
वेरूळ-औरंगाबाद
वेरूळ - येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेवास महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वकालावर लाखो भाविक बम बम भोलेच्या जयघोषात लीन झाले यावेळी भाविकानी पहाटे पासुनच दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने शिवालय तीर्थ ते घृष्णेश्वर मंदिर अशी दिवसभर दर्शन रांग दिसून येत होती तर देवस्थान ट्रस्ट , पुरातत्व विभाग , ग्रामपंचायत , तहसील प्रशासन , पोलिस प्रशासन , वैद्यकीय विभाग , पंचायत समिती सह संबधित सर्वच विभागाने परिश्रम घेत योग्य नियोजन केल्याने भाविकांचे शांततेत दर्शन होत होते तर मंदिर परिसरात दिवसभर प्रसाद व पाणी वाटप करण्यात आल्याने भाविकांचा दर्शन रांगेतला त्रास कमी होत होता तर महाशिवरात्री निमित्त दुपारी चार वाजेनंतर भगवान शिवाची मंदिर ते शिवालय तीर्थ अशी भव्य वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली होती
यावेळी भाविकानी मोठ्या प्रमाणावर रेवडया प्रसादाची उधळन केली तर शिवालय तीर्थावरती मुख्य पुजारी रवी पुराणिक यांच्यासह समस्त ब्रम्हवृंद , गुरववृंद यांच्या उपस्थिति मध्ये देवांचे स्नान व महाभिषेक सोहळा संपन्न झाला तर ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक जगदीश सातव , पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तगडा पोलीस बंदोबस्त मंदिर व परिसरामध्ये ठेवण्यात आला होता तर महाशिवरात्री यात्रोत्सव सुखरूप पार पडावा म्हणून तहसीलदार राहुल गायकवाड , देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष शशांक टोपरे , माजी अध्यक्ष दीपक अग्निहोत्री , कार्यकारी विश्वस्त योगेश विटखेडे , चंद्रशेखर शेवाळे , सुनील जोशी , रवींद्र पुराणिक , कुणाल दांडगे , सौ रेखा ठाकरे , व्यवस्थापक संजय जोशी , सरपंच संगीता राठोड , उपसरपंच विजय भालेराव , तंटामुक्ती अध्यक्ष नाना ठाकरे , माजी सरपंच प्रकाश पाटील , सदस्य संतोष फुलारे , पोलीस पाटील रमेश ढिवरे , किशोर काळे , मंगेश पैठणकर यांच्यासह ग्रामस्थ , पदाधिकारी , प्रशासकीय अधिकारी , कर्मचारी परिश्रम घेत होते
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी ( मौनगिरीजी ) महाराज यांच्या गादी परंपरे नुसार सालाबाद प्रमाणे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज हे जनार्दन स्वामीच्या पालखीसह दिवसभर संकल्पित समाधी मंदिरात बसून येणाऱ्या भाविकाना दर्शन देवून प्रसाद वाटप करीत होते तर यावेळी आश्रमा तर्फेही दिवसभर फराळ प्रसाद वाटप करण्यात येत होता.