B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
नांदगांव येथे दिनांक २३/१२/२०१९ रोजी आत्मरंग फाउंडेशन आयोजित आत्मरंग राज्य स्तरीय चित्रकला स्पर्धा लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कुल नांदगांव या केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेली होती
त्या मध्ये लिटिल स्टार शाळेचे सर्व विध्यार्थी यांनी सहभाग नोंदवला होता व आपली कला सादर करून चिमुकल्यानी विविध प्रकारचे देखावे सादर केले होते त्यात शाळेचे २३ विध्यार्थी यांनी यश संपादन करून आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले.
त्यात इयत्ता चौथीची सोनाक्षी प्रज्ञानंद जाधव हिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे
तर इयत्ता पहिली प्रथम क्रमांक समृद्धी शंकर जगदाळे,इयत्ता दुसरी दुसरा क्रमांक जिजासा रवींद्र गायकवाड,इयत्ता तिसरी अनुष्का अविनाश ताडगे, तर केंद्रात जयेश सोनवणे,प्रथम,वंश जोशी केंद्रात दुसरा,स्वामिनी सोर केंद्रात प्रथम निशिता बोरसे,स्वरा बिरारी,आराध्या भतकर,हार्दिक सुरसे,रुपा सोनवणे,मोक्षता पारख,आनंत खेमणार,वैष्णवी चौधरी, निकुंज चांडक,ओम गोडलकर, रितेश बच्छाव, नीलम मोरे,आदित्य मोरे,अंकुश चव्हाण,रोशन जोरावर
शाळेचे यशस्वी विध्यार्थीचे संचालक श्री बागुल सर सौ बागुल म्याम,शिक्षिका सुवर्णा आव्हाड,वर्गशिक्षिका कोमल ठाकरे,सर्व शिक्षिका कर्मचारी वृंद त्याच प्रमाणे आत्मरंग फाउंडेशन तर्फे अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.