उर्दू राष्ट्रीय एकात्मतेची भाषा-डाॅ.काझी अख्तर सुलताना*

0
BNN
बाबासाहेब दांडगे
खुलताबाद


खुलताबाद---
चिश्तीया कला व विज्ञान महाविद्यालय खुलताबाद येथे उर्दू विभागतर्फे डाॅ काझी अख्तर सुलतान यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रम अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शेख इजाज होते तर व्यासपीठावर डाॅ सिद्दीकी अफरोजा होते.
यावेळी डाॅ काझी अख्तर सुलतान म्हणाल्या उर्दू ही भाषा एकमेकांना जोडणारी व गोडवा निर्माण करणारी भाषा आहे. फार प्राचीन काळापासून उर्दू  भाषा आहे. माणसाने स्वतःला ओळखले  तर जीवनात यशस्वी होईल. उर्दू भाषा  मुस्लिमांची नाही तर सर्वांची भाषा आहे  असे म्हणाल्या.
यावेळी उर्दू विभागतर्फे भित्तीपत्रिकेचे प्रकाशन  करण्यात आले. अध्यक्षीय समारोप डाॅ शेख इजाज यांनी केला.

कार्यक्रम सूत्रसंचालन प्रा नाझिया बेगम यांनी केले. प्रास्ताविक डाॅ सिद्दीकी अफरोजा यांनी केले तर आभार डाॅ शेख नूरजहाँ यांनी मानले.
यावेळी प्रा सुनील जाधव. डाॅ रामटेके पुरुषोत्तम. डाॅ भालेराव अशोक.डाॅ मोहम्मद अली.  डाॅ पटेल बिल्कीस.प्रा शेख शाईस्ता. डाॅ देशपांडे शिल्पा. प्रा सैफ जैदी.शहा हाशम व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top