B.N.N
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
नाशिक
नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुसुमतेल, ढेकु, जातेगाव, लोढरे, चंदनपुरी, वसंतनगर, बोलठाण, गोंडेगाव, जवळकी, रोहीले इत्यादी गावांंच्या परिसरात सायंकाळी सहा वाजेपासून ढगाळ वातावरण आणि विजेच्या गडगडाट सुरु झाला व साडेसात वाजेच्या सुमारास अचानक बेमोसमी पावसाच्या सरी व शेंगदाण्याच्या आकाराच्या गारा पडण्यास सुरुवात झाली होती कोसळू लागल्याने तसेच कमी अधिक प्रमाणात हवा सुरु झाल्याने शेतकर्यांची धांदल उडाली, त्यातच अचानक विज गेल्याने धावपळ झाली.
या बेमोसमी पावसामुळे काढणीस आलेल्या कांद्याचे पिक, गहू, हरबरे तसेच ज्या शेतकरी बांधवांचे मकाच्या पिकाची कापणी करुन उघड्यावर ठेवलेल्या मकाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास असमानी संकट उभे ठाकले आहे.