गुलाब वाघ,
लासुर स्टेशन प्रतिनिधी....
तालुक्यातील माळीवाडगाव येथील ग्रामसेवक राजेंद्र जयराम रावते याने तक्रारदार सागर शामू गायकवाड (वय वर्ष 32 ) रा.माळीवाडगाव ता.गंगापूर यांना रमाई आवास योजने अंतर्गत तक्रारदार यांचे नाव पडताळणी कामी पाठवल्याचे बक्षीस म्हणून पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती दरम्यान गायकवाड यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाला कळवले व आज लासुर स्टेशन बसस्थानाक परिसरात सकाळी 11 वाजेच्या दरम्यान ग्रामसेवक राजेंद्र रावते यास लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यानी पाच हजार रुपयांची लाच स्वतः ग्रामसेवक घेत असताना धाड टाकून रंगेहाथ पकडले.
हि कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया,पोलीस अधीक्षक,श्रीमती अनिता जमादार,अप्पर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. औरंगाबाद , ब्रह्मदेव गावडे,पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती रेश्मा सौदागर, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. यांच्यासह पो.ना. रविंद्र अंबेकर, पो. ना. गोपाल बरंडवाल,पो.कॉ. किशोर म्हस्के चालक पो. कॉ. शिंदे यांनी केली.