व्यसनापासून दुर राहीलात तरच प्रगती- ह.भ.प. जगन्नाथ महाराज सोनटक्के

0


B.N.N
अरुण हिंगमिरे
जातेगाव, नांदगाव

नांदगाव तालुक्यातील जातेगाव
येथे व्यसनापासून दुर राहिलात तरच प्रगती निश्चित आहे, मग ते वेसन तंबाखू, विडी सिगारेट दारुचे असो किंवा इतर अमली पदार्थांचे असो या सर्वांपासुन नेहमीच दुर राहिले पाहिजे असे ह.भ.प जगन्नाथ महाराज सोनटक्के पंढरपूरकर यांनी येथील ग्रामदेवता श्री पिनाकेश्वर महादेवाच्या गावातील महादेवाच्या मंदिराच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित दि. ३० जानेवारी रोजी सुरु झालेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या दि.६ रोजी गुरुवारी काल्याच्या किर्तणात उपस्थित हजारो तरुण, पुरुषांना आव्हान केले.


तसेच स्त्री भ्रुणहत्या करणे हे महा पाप असुन एक मुलगी दोन कुळांचा उध्दार करते, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच महत्वाच्या पदांवर महिला अगदी यशस्वीपने सांभाळत आहे. तरी मुलगाच वंशाचा दिवा ह्या जुनाट विचारापासून अलिप्त होण्याची वेळ आली आहे असे आव्हान महिलांना याप्रसंगी केले. यावेळी त्यांनी अगदी सोप्या भाषेत व्यसनमुक्ती आणि स्त्री भ्रुणहत्यांं बाबत अनेक उदाहरणे देउन सोनटक्के महाराज यांनी प्रबोधन केले. 

तसेच येथील सुमारे सहाशे तरुण भारतीय सैन्यदलात कार्यरत असल्याने तसेच महाराष्ट्रात सैन्यदलात प्रत्येक भरती प्रक्रियेत सहभागी होउन त्यापैकी किमान पाच तरुण कुठलेेही प्रशिक्षण न घेेता फक्त जिद्द आणि देशसेवा नजरेसमोर ठेेेवून शारीरिक चाचण्यांचे सर्वव परीक्षांमध्ये यशस्वी होऊन  देश सेवेचे व्रत जोपासत असल्याने सैन्यदलातील जवानांच्या पालकांचेे त्यांनी अभिनंदन केले. वरील अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात दररोज पहाटे काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन हरिपाठ आणि किर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प.पांडुरंग काका चिकटगावकर यांनी केले, या कार्यक्रमाची सांगता दहीहंडी फोडून महाप्रसाद वितरण करुन करण्यात आली


 सप्ताह कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष मेहतर, सोपान खिरडकर, बाळू काटे, रामदास पाटील, अंबादास रवळेे, चांगदेव शिंदे, विजय पाटील आणि महादेव मंदिर भजनी मंडळ, संत सावता महाराज भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top