B.B.N गंगापूर प्रतिनिधी
खलिल पटेल
गंगापूर बनावट आधारकार्ड बनून तोतया जमीन मालकाने दोन वेळा दोन वेगवेगळ्या व्यक्तींना जमीन विक्री केल्याप्रकरणी तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका जणास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील गाजगाव येथील बाबुराव दत्तू लहाने यांच्या मालकीचे गट नंबर 152 मधील एक हेक्टर 61 आर जमीन 13/3/2014 ते 3/8/2019 दरम्यान दोन जणांना बाबुराव दत्तू लहाने यांचे नाव धारण करून जमिनीचा मूळ मालकाचे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड तयार करून जमीन परस्पर खोटे खरेदी दस्त करून घेत दोन वेळेस वेगळ्या व्यक्तीला विक्री केली आहे.
त्या बनावट व्यक्तीने बाबुराव लहाने यांचा आधार कार्ड वापरून त्यावर फोटो बदलून खरेदी-विक्रीचे काम केले आहे याप्रकरणी दुय्यम निबंधक औदुंबर लाटे यांच्या फिर्यादीवरून भादवी 420 ,468, 471, 34, 82 (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून राजकुमार महेंद्र सिंग चंदेल मूळ राहणार इंदोर हल्ली मुक्काम वाळूज औरंगाबाद यास अटक करण्यात आली आहे पुढील तपासात. आणखीन काही मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता आहे गंगापूर पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रल्हाद मुंडे पोहे का कैलास निंभोरकर पोलीस नाईक मनोज बेडवाल गणेश खंडागळे हे तपास करीत आहेत