B.N.N
अरुण हिंगमिरे
नांदगाव, नाशिक
नांदगांव सारनाथ बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी शहरातील एल फ सारनाथ वस्ती संगातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रमुख उपस्थितीत गंगावणे म्याम, महिरे सर,ऍड विद्या कसबे,सुनीता जाधव,साक्षी आहिरे,अशोका पवार, निर्मला केदारे, कामिनी साळवे हे उपस्थित होते. माता रमाई यांची भूमिका पाच वर्षांची चिमुकली गौरी भोसले हिने साकारली होती, तर मातारमाई यांच्या गीतांवर बाल कलाकारांनी आपले नृत्य सादर केले होते.
कार्यक्रमात सर्व समाजातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी एल फ च्या अध्यक्ष सुजाता अडकमोल, सचिव सानिया भाभी,प्रमिला काळे, सुनीता देहाडे, मीना घुसळे, शोभा बच्छाव, वैशाली बर्डे, स्मिता गोटे, तबसुम बेग,जया देवकाते यादिनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता एल फ सारनाथ वस्ती संग यांच्या तर्फे खीरदान वाटप केले तर सुजाता महिला मंडळा तर्फे केळी वाटप करण्यात आली या कार्यक्रमात एकविरा वस्ती स्थर संग, निलंबरी वस्ती स्थर संग यांनी ही सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता शिंदे यांनी केले तर आभार मंगला साळवे यांनी मानले.