हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले

0
B-N-N
समाधान घुले

 .


 जाती, धर्माच्या चौकटीत अडकलेल्या लोकांसाठी बनोटी (ता.सोयगाव) येथील नुरानी मशिदीचे इमाम शेख रऊफ यांनी शुक्रवारी (ता२१) अमृतेश्रवर संस्थानाच्या यात्रा महोत्सवात दाखल झालेल्या दिंडी तील भाविकांना फराळाची व्यवस्था करुन दिंडीत परिवारासह सहभागी होऊन हिंदु मुस्लिम ऐकतेचे दर्शन घडविले.
बनोटी येथील प्रसिद्ध अमृतेश्रवर संस्थानाच्या महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने पाच दिवशीय यात्रा महोत्सव आयोजित केला जातो.


संस्थेचे संस्थापक माहुजी महाराज यांनी बनोटीसह जळगाव जिल्ह्य़ातील आडगाव, निंभोरी आणि वाणेगाव येथेही संस्थान निर्माण केले आहेत. बनोटी येथे शके १८४२ साली मंदीर निर्मानापासुन महाशिवरात्री निमित्ताने आयोजित महोत्सवासाठी चारही संस्थानाच्या दिंड्या येत असतात. बनोटी येथे दिंड्या दाखल झाल्यानंतर कमेटीचे अध्यक्ष धनंजय खैरनार आण सचिव मुकेश जैन, नुरानी मशिदीचे इमाम शेख रऊफ यांनी स्वागत केल्यावर परिवारासह हजेरी लावलेल्या इमामांनी मठाधिपती भानुदास महाराजांचे यांचे पुजन केले तसेच दिंडीत सहभागी शेकडो भाविकांना परिसरासह स्वतःच्या हाताने उपवासाची फराळ, केळे वाटप करीत मन तृप्त केल्यानंतर स्वतः दिंडीत सहभागी होत हरीनामाचा जयघोष करीत अमृतेश्रवर भगवानाच्या मंदिरापर्यंत पोहचल्यावर मठाधिपती भानुदास महाराज यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी यात्र महोत्सवासाठी दाखल झालेल्या परिसरात गावातील ग्रामस्थ त्यांनी दाखविलेल्या सौंदर्याबाबत चर्चा करीत होते...

समाधान घुले बिंदास मिडिया बनोटी सोयगाव.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top