शेतजमिनीत जाण्यासाठी त्वरीत रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी भारतीय वायु सेनेतील वायुसैनिकाचे उपोषण

0
 BNN
सौरभ लाखे



वैजापुर तालुक्यातील अंचलगाव शिवारातील गट क्रमांक 113/01 मधील शेतजमिनीत जाण्यासाठी असलेला वहिवाटीचा रस्ता काही व्यक्तिनी जुन 2014 पासुन अडवून  देशसेवेत कार्यरत असलेल्या कार्पोरल अमोल विलासराव नाजिरे या वायुसैनिकाच्या परिवाराची अवहेलना करत आहे. दळणवळणासाठी गैरसोय होत असल्याने त्वरीत रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवार दि 17 फेब्रुवारी पासून वायूसैनिक अमोल नाजीरे  हे आपल्या कुटुंबासोबत औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण करणार आहेत.


जिल्हाधिकारी  यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इ.सन 1963 मध्ये जमीन खरेदीपासून गट क्रमांक 114/02 च्या पूर्व दिशेच्या बाजूने वहिवाटीच्या रस्त्याचा दळणवळणसाठी वापर होत होता मात्र या रस्त्यावर शेतजमीन असलेले श्री वसंत कारभारी निकम, गणेश व ज्ञानेश्वर विजय निकम रा. अंचलगाव ता. वैजापुर यांनी हा रस्ता जुन 2014 पासुन अडवून, सतत कोणत्याही कारणाने भांडने करून आमची अवहेलना करत आहे व जमिन विकुन येथून निघून जावे अशी स्थिती बनवली आहे.
हक्काच्या रस्त्याच्या मागणी बाबत याआधी तहसीलदार वैजापुर  यांच्यासह शासनदरबारी जुन 2014 पासुन पाठपुरावा केला मात्र तक्रारीची व्यवस्थित दखल घेतली गेली नाही उलट आमच्या विरोधात न्यायनिर्णय नोव्हेबर 2017 मध्ये देण्यात आल्याचे निवेदनात लिहिले आहे. 

एखादा जवान शहीद झाल्यावर शासकीय यंत्रणा सांत्वन करून राज्यकर्ते शहीदाच्या कुटुंबाच्यासोबत असल्याचा कांगोवा करतात मात्र देशसेवेत कार्यरत सैनिकांचे कुटुंबासह  जिवंतपणीच असे हाल होत होत असल्याची खंत देखील यात नमूद करण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top