नांदगाव येथील कासलीवाल विद्यालयातील १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल केली कृतज्ञता व्यक्त

0


B.N.N

अरुण हिंगमिरे
नांदगाव, नाशिक

नांदगाव, जे.टी कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल व सौ कमलाबाई  माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालय नांदगाव विद्यालयात १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुनिल कुमार कासलीवाल हे होते. तर समारंभाचे प्रमूख पाहुणे नांदगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकूळे हे होते. याप्रसंगी १० वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षण सांगीतले. तसेच शिक्षकांना कधीही विसरु शकत नाही असे ह या वेळी वैषणवी पाटील, कृतीका गांगुर्डे, ओम लोहाडे, समीर सरोदे, तनिष्का गुप्ता,भक्ती करवा, कुणाल गुप्ता, रोजी कोळगे, मोक्षदा चव्हाण, प्राची  जेजूरकर, हया विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षकांबद्दल  कृतज्ञता व्यक्त केली.


 संस्थेचे अध्यक्ष सुनिल कुमार कासलीवाल यांनी मनोगत व्यक्त करतांंना भाषणातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला, भविष्यात  येनार्या अडचणींवर मात करा, मित्रांच्या संपर्कात रहा असे सांगून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी गुप्ता सर यांनी मुल्य जपण्याचा संदेश देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे संस्थेचे सेक्रेटरी विजयकुमार चोपडा, जूगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, सुशिलकुमार कासलीवाल, महेंद्रकुमार चांदीवाल, मुख्याध्यापक राजेंद्र खरोटे प्राचार्य मॅथ्यू येवले सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विशाल सावंत, शरद सावंत, गोरख डफाळ, बागूल सर, चोलके सर, दत्ता पवार, माधुरी पगार, लोपिस सर, बागले सर,संदीप आहेर व शिक्षक वृंदांंनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या मनतील कल्पना कागदावर उतरवित तयार केलेले हस्तलिखीत अंकुर व व्हिजन या पुस्तकांंचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मागिल हस्तलिखित मध्ये केलेले लेखनाच्या प्रती देण्यात आल्या. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेला कृतज्ञता पूर्वक    भेटवस्तू  दिली. त्यानंतर अल्पोपहाराचा स्वाद घेतला. व फोटो सेशन्स झाले. समारोहाचे सुत्रसंचालन योगीता गायकवाड व नीलीमा निकम यांनी तर आभार रीटा उबाळे यांनी मानले .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top