जिल्हा परिषद शाळेतील दहाविच्या विद्यार्थ्यांना निरोप

0
B-N-N 
आरेफ पटेल
टाकळी राजेराय ,
खुलताबाद, औरंगाबाद   




टाकळी राजेराय (ता.खुलताबाद) येथिल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भावी आयुष्यास शुभेच्छा देत गुरुवारी (ता.२०) नववीच्या विद्यार्थी व शाळेतर्फे एका छोटेखानी कार्यक्रमात निरोप देण्यात आला.


 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक वसंत राठोड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षक सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख गणेश पिंपळे हे होतो. यावेळी आदित्य औटे, साहील शेख, किरण जाधव, मुजाहिद शेख, श्रध्दा सपकाळ, अश्विनी आगे, आदीं विद्यार्थ्यांनी आपले शालेय जिवनातील आठवणींना उजाळा देत शाळेत घडलेल्या घटनेला पुन्हा एकदा आठवत घडलेल्या चुकाबद्दल शिक्षकाची माफी मागुन , आतापर्यत जसे मार्गदर्शन व उणिवा दाखवल्या तश्याच भविष्यातही मार्ग दाखवावे अशी विनंती केली.

शिक्षक हा आकार देण्याचा प्रयत्न करतो, मातीला वळण देण्याचा प्रयत्न करतो, पण तो आकार व वळण कसे घ्यायचे हे विद्यार्थ्यांनी ठरवायचे असते, शिक्षकांनी दिलेला आकार घेउन आता भविष्यात नक्कीच काही करुण दाखवण्याचा संकल्प या वेळी विद्यार्थ्यांनी केले. यावेळी छायाचिञकार गणेशष जाधवसह प्रदिप सोनार, विपुल तिळवे, संताराम गायकवाड, शेख हबीब, प्रकाश सोनवणे, अजिनाथ पांडव, विवेक घुगे,संतोष कायस्थ अश्विनी तुरेराव आदिसह शिक्षक विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुञसंचालन नववीती विद्यार्थ्यींनी पुजा बनकर याने केले तर आभार मुनज्जा पठाण या विद्यार्थ्यीने मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top