सभापती आदिवासी प्रकल्पात...थेट सेविकांशी संवाद सकस पोषण आहार मिळणे हा बालकांचा हक्क-- बालकल्याण सभापती अश्विनीताई आहेर

0


B.N.N
अरुण हिंगमिरे
नाशिक

 महिला व बालकल्याण समिती सभापती यांनी आजपासून नवीन उपक्रम सुरू केला, अंगणवाडी सेविकांना केंद्रातील योजनाची माहीती घेणे / देणें, अंगणवाडी केन्द्र स्तरावरील अडीअडचणी समजावून घेणे, व कुपोषण कमी करण्यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी अंगणवाडी सेविकांना जिल्हा स्तरावर बोलावून घेणेपेक्षा आपणच थेट आदिवासी प्रकल्पात जाऊन थेट अंगणवाडी सेविकांशी संवाद साधवा असा धोरणात्मक निर्णय जि. प.महिला व बालकल्याण समिती सभापती आर्किटेक्ट कु.अश्विनी अनिलकुमार आहेर यांनी घेतला.. या उपक्रमांतर्गत काल

दिनांक.6/02/2020 रोजी कळवण या आदिवासी तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प-१ व २ मधील ३१५ अंगणवाडी सेविकाची कामकाज बैठक कळवण पंचायत समिती सभागृहात घेऊन अंगणवाडी सेविकांशी थेट संवाद साधला* .थेट सभापती यांचेशी संवाद साधता आल्यामुळे अंगणवाडी सेविका यांचे मध्ये मोठ्या प्रमाणावर समाधान व चेहऱ्यावर आनंद दिसून आला..


कळवण येथील दिव्यांग अंगणवाडी सेविका यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझे सेवेच्या पूर्ण आयुष्यात एकदाही सभापती मॅडम ची समक्ष भेट झाली नव्हती आज प्रत्यक्ष सभापती यांची भेट झाली व संवाद साधता आला त्यामुळें आदीवासी दुर्गम भागात काम करून बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळाले .कुपोषण कमी करणे, महिला व बालविकासाच्या योजनाची अमलबजावणी करण्यासाठी जोमाने काम करू...

 *सभापती व सेविकामध्ये कुपोषण मुक्ती,बेटी बचाव- बेटी पढाव , माझी कन्या भाग्यश्री या योजनांवर सखोल चर्चा होऊन योजनेचा गावं-खेडे-वाडे-वस्ती पातळीवर प्रचार व प्रसिध्द करण्यावर भर देण्यात आला.तसेच महिलां व मुलींना कराटे प्रशिक्षण., ब्युटी पार्लर प्रशिक्षण ,शिवणकाम यासारखे व्यावसायिक प्रशिक्षणास मुलींना प्रोत्साहन देणे साठी प्रयत्नशील राहावे असे जि. प.महिला व बालकल्याण समिती सभापती आर्किटेक्ट कु.अश्विनी अनिल आहेर यांनी आवाहन केले.* याप्रसंगी कळवण पंचायत समिती सभापती सो. मीनाक्षी चौरे,गट विकास अधिकारी बी.बी.बहिरम, बालविकास प्रकल्पधिकारी श्रीमंती लोखंडे तसेच पर्यवेक्षिका उपस्थित होते

अंगणवाडी केंद्राचा मुख्य उद्देश 0 ते 6 वयोगटातील बालकांना पोषण आहार ,पूर्व शालेय शिक्षण देणे हा आहे.
*सकस पोषण आहार मिळणे हा बालकांचा हक्क* ..आहे त्यापासून बालकांना वंचित ठेवल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा जि. प.महिला व बालकल्याण समिती सभापती आर्किटेक्ट कु.अश्विनी अनिल आहेर यांनी दिला..

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top