सदाभाऊ खोतांच्या मेळाव्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

0
खलिल पटेल
BBN

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा गंगापूर येथील रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी मेळाव्याला शेतकऱ्यांनी फिरवली पाठ दिनांक 10 फेब्रुवारी सकाळी 11=00 वाजता शिव कृपा मंगल कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला होता .

पन 1=00 वाजेपर्यंत कोणीच मेळाव्याकडे फिरकला नाही मंत्री महोदयांनी तीन तास बसून ही  शेतकरी मेळाव्याकडे फिरकले नाही 15 ते 20  कार्यकर्त्या सोबत चर्चा करून सदाभाऊ खोत मेळाव्यातून  परतले सदाभाऊ खोत यांच्या गेल्या चार-पाच वर्षाच्या ध्येय धोरणावर शेतकऱ्यांना शंका असल्यामुळे शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने या शेतकरी मेळाव्यात पाठ फिरवली आहे सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कार्यकर्त्याना जोडण्याचं काम हाती घेऊन महाराष्ट्रभर संघटन बांधणी दौरा व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन शेतकर्‍यांच्या समस्या आणि प्रश्नांवर

महाराष्ट्रभर आंदोलन करून पुन्हा एकदा नव्या जोमात महा विकास आघाडीच्या सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारणार आहेत परंतु राजू शेट्टी यांची साथ सोडल्यानंतर  शेतकरी सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेवर नाराज आहे त्यामुळे रयत क्रांती संघटनेच्या गंगापुर तालुक्यातील या मेळाव्याला शेतकऱ्यांनी जाणीपूर्वक पाठ फिरवल्याचे दिसून आले सदाभाऊ खोत यांच्या चेहऱ्यावर सदरील मेळावा न झाल्याने नाराजीचा सूर दिसला त्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांशी हितगूज करून सदाभाऊ खोत इथून निघून गेले आयोजकांनी दोन हजार लोकांचा जेवणाची व्यवस्था केली होती शहरात बॅनर होल्डिंग लावण्यात आले होते एवढा मोठा खर्च करूनही शेतकरी वर्ग मेळाव्यात आले नाही त्यामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top