धार्मिकतेबरोबर लाखो तरुणांना व्यसनमुक्त करनारे अवलिया संत सुखदेव महाराजांची दिंडीचे शिंगणापूरला प्रस्थान.....

0
गुलाब वाघ
BNN

श्रीक्षेत्र वाकी (नेवपूर) येथील श्री.शनिमहाराज देवस्थानचे महंत 1008 संत सुखदेव महाराज यांच्या दिंडीचे सालाबादप्रमाणे याही वर्षी वाकी ते शनी शिंगणापूर दरम्यानचे पायी दिंडीचे पुढील प्रस्थान आज लासुर स्टेशन येथून  झाले.
               यावेळी बोलताना संत सुखदेव महाराज म्हणाले की आमच्या तीर्थक्षेत्र श्री.शनी महाराज देवस्थान हे देवस्थान मार्फत नुसते धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन न करता लाखो तरुणांना दारू,गुटका,तंबाखू, व विविध प्रकारच्या व्यसनापासून आत्तापर्यंत मुक्त केलेले आहे याबरोबरच झाडे लावा झाडे जगवा स्वछता अभियान,पाणी आडवा पाणी जिरवा,जलस्वराज्य अभियान वाकी देवस्थांनतर्फे  प्रभावीपणे राबवले जात असून अजूनही अनेक समाजुपयोगी उपक्रम राबवून धार्मिकतेबरोबरच सामाजिक बांधिलकी देवस्थान राबवत असल्याने अनेक भावीकभक्त यांची नाळ आमच्याशी जजोडल्याचे संत सुखदेव महाराज यांनी सांगितले त्यामुळे राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील तरुणही या पायी दिंडीत दरवर्षी सहभागी होत असतात शनी शिंगणापूर प्रमाणे बीड जिल्ह्यातील शनीचे राक्षसभुवन  या ठिकाणीही पायी दिंडी वाकी येथून दरवर्षी काढली जाते.

                   दरम्यान आज लासुर स्टेशन येथील व्यापारी सचिन पाटणी यांच्या निवासस्थानी  सहकुटुंब हस्ते सुखदेव महाराज यांचे गुरुपुजन करण्यात आले त्यानंतर दिंडीतील सर्व भक्तांनाही भोजन देण्यात आले यावेळी प्रतिष्ठित व्यापारी मुकेश भाटिया, संतोष पाटील जाधव,हेडगेवार बँकेचे व्यवस्थापक किशोर चव्हाण,गणेश मतसागर,ज्ञानेस्वर जाधव आदींसह गावकरी मंडळी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.....

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top