B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
भाजपाच्या नांदगाव तालुका अध्यक्षपदी लक्ष्मीनगरचे सरपंच तसेच ४२ खेडी पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष बापूसाहेब जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने परिसरातून अभिनंदन होत आहे.
बुधवार (दि १८ ) रोजी भाजपच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष केदा आहेर याच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाबरोबरच दुष्काळी परिस्थितीत ४२ खेडी पाणीपुरवठा योजनेचे यशस्वी नियोजन करत दुष्कळ निवारणासाठी महत्वाची भूमिका बजावण्याचे काम देखील जाधव यांनी केले होते.
यापूर्वी दत्तराज छाजेड याचा तीन वर्षांचा तालुका अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने बोलविण्यात आलेल्या बैठकीत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच असल्याने अध्यक्ष पदाचा तोडगा निघत नव्हता मात्र जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी सक्रिय असलेल्या व पक्षाचे प्रामाणिक काम करणाऱ्या योग्य व्यक्तीच्या गळ्यात तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्याने तालुक्यात भाजपाची ताकद वाढण्यास मदत होईल अशी यावेळी चर्चा सुरु होती. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार ,भाजपचे नाशिक जिल्हा सरचिटणीस भाऊराव निकम किसान आघाडी तालुका अध्यक्ष आनंदराव घाडगे, , ज्ञानेश्वर जाधव आदी यावेळी उपस्थित होते ,