B.N.N
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येनारा १२९ व्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र लाठे वंचित बहुजन आघाडीच्या युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब लाठे, चिमाजी लाठे, तुकाराम लाठे, टि.बी.लाठे, भिमराव निकम, अशोक महाले यांच्या उपस्थितीत मंगळवारी दि.१० रोजी दुपारी बैठक घेण्यात आली. यावेळी उत्सव समितीमध्ये युवकांना स्थान देेेण्यात यावेे असा एकंदरीत तरुणांनी मागणी केली त्यानुसार उत्सव समितीच्या अध्यक्षपदी देवीदास सोनवणे, उपाध्यक्ष कडू त्रिभुवन, सचिव गौतम शिंदे, खजिनदार अर्जुन सोळस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून शंकर लाठे, राजु त्रिभुवन, सुनील सुर्यवंशी, अशोक लाठे, प्रफुल्ल बागुल, अशितोष सोनवणे, कचरु साळवे, आप्पा त्रिभुवन, आकाश महाले यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.